जन्मकल्याणक महोत्सव समितीने दिले प्राणवायू यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST2021-04-28T04:44:21+5:302021-04-28T04:44:21+5:30

कारंजा लाड : कोरोनाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस भर पडत असून व्हेंटिलेटर, ऑक्सिजनच्या मागणीत ...

Oxygen machine provided by Janmakalyanak Mahotsav Samiti | जन्मकल्याणक महोत्सव समितीने दिले प्राणवायू यंत्र

जन्मकल्याणक महोत्सव समितीने दिले प्राणवायू यंत्र

कारंजा लाड : कोरोनाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस भर पडत असून व्हेंटिलेटर, ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीसाठी शहरवासीयांनी पुढे यायला हवे, असे भावनिक आवाहन उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. भाऊसाहेब लहाने यांनी केले.

२४ एप्रिल रोजी कारंजा येथील मोहन पंजवानी , सुनील जवाहरमलानी, विजय नागवानी, नितेश फुलवानी, सतीश पंजवानी, प्रकाश फुलवानी, विक्रम गुरवनी आणि विजय जेसवानी या व्यापाऱ्यांनी बाधित रूग्णांच्या मदतीकरिता ९ हजार रूपयांची मदत केली ; तर कारंजा येथील भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीने महावीर जयंतीचे औचित्य साधून सर्व धार्मिक विधी रद्द करीत ६० हजार रूपये किमतीची विदेशी निर्मितीचे उच्च तंत्रज्ञान असलेली एक ऑक्सिजन मशिन उपजिल्हा रूग्णालयास भेट दिली. सदर मशिन २ मे रोजी उपजिल्हा रूग्णालयास सुपुर्द केली जाणार आहे. यानिमित्ताने झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना डाॅ. लहाने म्हणाले, कारंजा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे, म्हणून मागील दोन वर्षांपूर्वी कारंजा येथील बसस्थानकाच्या मागील भागात १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात आले, परंतु या रूग्णालयात पुरेशा सुविधा नसल्याने रूग्णांना उपचारासाठी बाहेरगावी जावे लागत आहे. आता रूग्णालयात व्हेंटिलेटर , जनरेटर व ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध झाली असून दिव्यांगांसाठी रॅम्प, लिफ्ट व इतर सुविधा उपलब्ध करणे सुरू आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गडद झाले असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. अनेक रुग्णांची परिस्थिती जेमतेम असून त्यांना मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन यावेळी लहाने यांनी केले.

Web Title: Oxygen machine provided by Janmakalyanak Mahotsav Samiti