प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST2021-09-11T04:42:57+5:302021-09-11T04:42:57+5:30
यासंदर्भात माहिती देताना तांत्रिक कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी सांगितले की, महापारेषण कंपनीत तृतीय व चतुर्थ श्रेणीत ...

प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांचा आक्रोश
यासंदर्भात माहिती देताना तांत्रिक कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी सांगितले की, महापारेषण कंपनीत तृतीय व चतुर्थ श्रेणीत कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. मोठ्या जबाबदारीची कामे निष्ठेने पार पाडण्याचे काम त्यांनी कित्येक वर्षांपासून केले. कार्यालयीन आदेशानुसार कंपनीत सुधारित मनुष्यबळ पुनर्रचनेची अंमलबजावणी करीत असताना कोणताही कर्मचारी कमी होणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र मनुष्यबळ पुनर्रचना लागू होताना मोठ्या प्रमाणात तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कामगारांची सेवा संपुष्टात आणली जात आहे. नियमित कामगारांची संख्या कमी झाल्यामुळे कंत्राटी कामगारांचा रोजगार हिरावून त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हा प्रकार हा निंदणीय असून, नागपूर व इतर परिमंडळातील कंत्राटी कामगारांना कमी करण्यासंबंधीचा आदेश त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशाराही देण्यात आला आहे.
वाशिममध्ये झालेल्या आंदोलनात विदर्भ क्षेत्रीय तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष रवी बारई, माजी विश्वस्त रवी वैद्य, असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत ननोरे, झोन पदाधिकारी ज्ञानेश्वर महंत, परमानंद बनगया, नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख मनीष धारम, विक्की कावळे, अमोल ठाकरे, अंगद जरूडकर, नीलेश कोडापे, प्रणय काळबांडे, प्रफुल्ल केणेकर, प्रफुल्ल निमजे, तुषार चांभारे, सूरज राऊत उपस्थित होते.