उकिरडे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST2021-07-31T04:40:55+5:302021-07-31T04:40:55+5:30
फलकाअभावी चालकांत संभ्रम वाशिम : मानोरा तालुक्यातील कारपा ते मानोरा मार्गाला जोडणाऱ्या आसोला खु. फाट्यावर दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे ...

उकिरडे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव
फलकाअभावी चालकांत संभ्रम
वाशिम : मानोरा तालुक्यातील कारपा ते मानोरा मार्गाला जोडणाऱ्या आसोला खु. फाट्यावर दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या नव्या चालकांत संभ्रम निर्माण हाेत आहे.
धानोरा ते कुंभी रस्त्यावर खड्डे
आसेगाव : मंगरूळपीर ते अनसिंग या मुख्य मार्गादरम्यान धानोरा ते कुंभीपर्यंतच्या अंतरातील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
‘त्या’ रस्त्याच्या डागडुजीची मागणी
वाशिम : मानोरा तालुक्यातील इंझोरी-म्हसणी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ग्रामस्थांना या रस्त्यामुळे अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. दुरुस्तीची मागणी हाेत आहे.
रस्त्यावर डबके, वाहनचालक त्रस्त
वाशिम : अकोला-आर्णी या नवनिर्मित महामार्गावरील शेलूबाजारनजीक असलेल्या पुलावर डबके साचत आहे. यामुळे वाहनधारकांना ये-जा करण्यात अडचणी येत आहेत.