काजळेश्वरात डेंग्युसदृश आजाराची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:41+5:302021-09-24T04:48:41+5:30

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे साथीच्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. काजळेश्वरसह परिसरात ...

Outbreak of dengue-like disease in Kajleshwar | काजळेश्वरात डेंग्युसदृश आजाराची साथ

काजळेश्वरात डेंग्युसदृश आजाराची साथ

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे साथीच्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. काजळेश्वरसह परिसरात सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. तर डेंग्युसदृश आजाराची साथही पसरली आहे. रुग्णात बालकांचे प्रमाण अधिक असून, उपचारासाठी अनेक बालकांना कारंजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय तरुण आणि वयोवृद्ध व्यक्तीही उपचासाठी खासगी दवाखान्यात धाव घेत आहेत. गावात साथीचे आजार पसरत असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजारांवर प्रतिबंधासाठी आराेग्य विभागाने तपासणी शिबिरांचे आयोजन करावे, तसेच ग्रामपंचायतने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात धूर फवारणी करावी, अशी मागणी प्रहार संघटनेकडून करण्यात आली आहे.

०००००००००००

कोटः प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा. साचलेले पाणी वाहते करावे. आरोग्य पथकाकडून गावकऱ्यांना तातडीने आरोग्य सुविधा पुरविल्या जातील.

- डॉ . प्रशांत वाघमारे,

वैद्यकीय अधिकारी काजळेश्वर

००००००००००००००

कोट: ग्रामस्थांंच्या आरोग्याचा विचार करता ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात धूर फवारणीचे काम अग्रक्रमाने सुरू केले जाईल, शिवाय नाल्यांची साफसफाई करून जलस्त्रोतांत औषधीही टाकण्यात येईल.

-सतीश वर्घट,

ग्रामविकास अधिकारी काजळेश्वर

Web Title: Outbreak of dengue-like disease in Kajleshwar