७३७ मंजुर पैकी केवळ ४७0 पथदिवे लागले

By Admin | Updated: July 22, 2014 23:59 IST2014-07-22T22:09:21+5:302014-07-22T23:59:46+5:30

मंजुर पथदिव्यांपैकी ४७0 पथदिवे लागले असून उर्वरित पथदिवे लवकरच लागणार आहेत.

Out of 737 sanctioned, only 470 roadshows have started | ७३७ मंजुर पैकी केवळ ४७0 पथदिवे लागले

७३७ मंजुर पैकी केवळ ४७0 पथदिवे लागले

वाशिम : शहरातील बर्‍याच भागात पथदिवे नसल्याने होत असलेल्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी शहरात ७३७ पथदिवे मंजुर झाले होते. मंजुर पथदिव्यांपैकी ४७0 पथदिवे लागले असून उर्वरित पथदिवे लवकरच लागणार आहेत. शहरात ७३७ पथदिवे मंजुर झाल्यानंतर बर्‍याच विद्युत खांबावर या पथदिव्यांना लागणारी विद्युत तार खांबावर ओढलेली नव्हती. सर्वप्रथम वायरिंग ओढण्याचे काम सुरू करण्यात आले. सदर काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील बर्‍याच भागात पथदिव्यांचा प्रकाश पडण्यास सुरूवात झाली आहे. ज्या भागात पथदिवे लावण्यात आले आहेत त्या भागात उत्साहाचे वातावरण आहे. काही भागात अद्याप पथदिवे सुरू झाले नसल्याने ते त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिकांतून केल्या जात आहे. यासंदर्भात नगरपरिषदचे इलेक्ट्रीक इंजिनियर प्रकाश गणेशपुरे यांच्याशी संपर्क साधला असता शहरातील बर्‍याच भागातील पथदिवे लावून झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. वाशिम शहर झपाटयाने वाढत असून दिवसेंदिवस नविन वसाहतीत वाढ होत आहे. वाशिम नगर परिषद क्षेत्रांअंतर्गत ज्या भागात पथदिवे नाहीत अशा बहुतांश भागात एकूण ७३७ नवीन पथदिवे लावणे, त्याकरिता जुन्या ६१३ विद्युत खांबावर पोल वायरिंग ओढणे तसेच १२४ नवीन विजेचे खांब उभारुन त्यावर वायरिंग ओढणे या कामाकरिता तीन वेगवेगळया निविदा मंजूर करुन सदर कामास सुरुवात करण्यात आली होती त्या अनुषंगाने काही भागात पथदिवेही सुरू झाले आहेत.

Web Title: Out of 737 sanctioned, only 470 roadshows have started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.