वाशिम जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन
By Admin | Updated: August 12, 2014 23:22 IST2014-08-12T23:22:17+5:302014-08-12T23:22:17+5:30
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

वाशिम जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन
वाशिम : जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम यांच्यावतीने सन २0१४-१५ जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वीच्या क्रीडा खेळांच्या नियोजनात बदल करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा आता १६ ऑगस्ट रोजी सन्मती भवन चवरे लॉईन कारंजा येथे होणार आहे. जिल्हास्तरीय फील्ड अर्चरी क्रीडा स्पर्धा १ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे होणार आहे. तर जिल्हास्तरीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा २ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा सकुल वाशिम येथे होणार आहे. वाशिम जिल्हयातील शैक्षणिक संस्थांनी खेळाडूंना उपरोक्त तारखेनूसार शाळेचा संघ्ज्ञ, खेळाडू स्पध्रेच्या ठिकाणी सकाळी ९ वाजता उपस्थित ठेवावा सोबत खेळाडूंचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन असे जिल्हा क्रीडा अधिकारी दिनकर उजळे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.