‘हेडफोन’ची ऑर्डर अन् मिळाला दगड; ऑनलाईन फसवणूक, कंपनीकडे तक्रार
By संतोष वानखडे | Updated: October 16, 2023 20:47 IST2023-10-16T20:45:21+5:302023-10-16T20:47:09+5:30
सध्या ऑनलाईन खरेदीचे फॅड वाढले असून, यामधून फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत.

‘हेडफोन’ची ऑर्डर अन् मिळाला दगड; ऑनलाईन फसवणूक, कंपनीकडे तक्रार
वाशिम : सध्या ऑनलाईन खरेदीचे फॅड वाढले असून, यामधून फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. वाशिम शहरातही ऑनलाईन पद्धतीने हेडफोनची ऑर्डर दिली असता, सोमवारी (दि.१६) सायंकाळच्या सुमारास ग्राहकाला कुरीअरमधून दगड मिळाला. यासंदर्भात संबंधित कंपनीकडे तक्रार करण्यात आली.
ऑनलाईन खरेदीचे जसे फायदे आहेत; अगदी त्याचप्रमाणे काही धोकेही आहेत. वाशिम शहरातील पप्पू घुगे यांनी एका ऑनलाईन संकेतस्थळावरून मोबाइलकरिता ‘हेडफोन’ची ऑर्डर केली होती. प्रत्यक्ष घरी साहित्य आल्यानंतर ते उघडून पाहिले तर त्यामध्ये चक्क दगडाचा छोटा तुकडा बघून धक्काच बसला. याबाबत त्यांनी तत्काळ खरेदी केलेल्या ठिकाणी संपर्क साधून रितसर तक्रार दाखल केली. तीन दिवसाच्या आत ‘हेडफोन’ मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले.
ऑनलाईन खरेदी जरा जपूनच...
ऑनलाईन खरेदीतून फसवणुकीच्या घटना समोर येत असल्याने ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी जरा जपूनच राहण्याचा सल्ला सायबर सेलने दिला.