शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉलिथीन’ बंदीचा आदेश धाब्यावर !

By admin | Updated: September 19, 2014 01:45 IST

वाशिम जिल्ह्यात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा राजरोस वापर; प्रशासनाचे दुर्लक्ष.

वाशिम : सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टिकचा जिल्हय़ात राजरोसपणे वापर सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या पत्राला पालिकेने केराची टोपली दाखविल्याचे आज १८ सप्टेंबर रोजी लोकमत टिमने केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून उघडकीस झाले. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे कचरा व्यवस्थापनात अडचणी येतात. प्लास्टिकमधील विघटन न होणार्‍या रसायनामुळे पर्यावरणाला मुख्य धोका निर्माण झाला आहे, हे सर्वङ्म्रृत आहे तरीसुद्धा जिल्हय़ामध्ये याचे कुणालाही काही देणे-घेणे नसून, ग्राहक तर कॅरीबॅग्ज मागतातच शिवाय दुकानदारही बिनदिक्कतपणे ते देत असल्याचे लोकमत चमूने केलेल्या स्टिंगद्वारे उघडकीस झाले आहे. ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक यादृष्टीने जास्त धोकादायक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ११ मे २0११ च्या आदेशानुसार ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरावर बंदी घातली असतानासुद्धा या आदेशाच्या नियमांची पायमल्ली सर्रास होत आहे. जिल्हय़ातील वाशिम, कारंजा, मालेगाव, रिसोड शहरामध्ये केलेल्या स्टिंग ऑपरशनमध्ये प्रत्येक शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर दिसून आला. प्लास्टिक बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेऊन पर्यावरणाला निर्माण झालेला धोका दूर करणे गरजेचे झाले आहे.