Orchard will grow in 111 hectares in Washim taluka! | वाशिम तालुक्यात  १११ हेक्टर क्षेत्रात फुलणार फळबागा !
वाशिम तालुक्यात  १११ हेक्टर क्षेत्रात फुलणार फळबागा !


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभत असून, या अंतर्गत वाशिम तालुक्यात प्राप्त अर्जातून १७० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, या योजनेंतर्गत तालुक्यात १११.५० हेक्टर क्षेत्रात फळबागांची लागवड केली जाणार आहे.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतक?्यांसाठी राज्य शासनाने नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना मंजूर करण्याचा निर्णय २० जून २०१८ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून पिक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकºयांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करूण देणे शासनास शक्य होणार आहे. या योजनेत आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर आदि फळझाडांची लागवड शेतकºयांना करता येत असून, नारळ रोपे वगळता इतर सर्व फळपिकांसाठी फक्त कलमांद्वारे लागवड करावी लागते. त्याशिवाय घन लागवडीचाही समावेश या योजनेत असून, शासनाने आता या योजनेत शेतकºयांना ठिबक सिंचन अनिवार्य केले आहे. या योजनेत सहभागी शेतकºयांना लागवडीसह ठिबक सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येते. अनुदानाचे प्रमाण ६० हजारांपासून ते २ लाखांपर्यंत आहे. या योजनेंतर्गत यंदाच्या हंगामासाठी वाशिम तालुक्यात ४२५ पेक्षा अधिक शेतकºयांनी अर्ज केले आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयच्यावतीने त्यापैकी १७० शेतकºयांची निवड करण्यात आली असून, हे सर्व शेतकरी मिळून तब्बल १११.५० हेक्टर क्षेत्रावर विविध फळझाडांची लागवड करणार आहेत. या लागवडीसाठी शासनाच्यावतीने यंदा शासकीय रोपवाटिकांत दर्जेदार कलमे उपलब्ध केली आहेत. त्याचा फायदा शेतकºयांना होणार आहे.


तालुक्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतर्गत विविध फळपिकांची लागवड करण्यासाठी शेतकºयांची निवड करण्यात आली आहे. प्राप्त अर्जांनाही पूर्वसंमती देण्यात आली असून, यंदाच्या हंगामात निवड झालेल्या शेतकºयांकडून १११.५० हेक्टर क्षेत्रात फळपिकांची लागवड होण्याची शक्यता आहे.
-अभिजीत देवगिरीकर
तालुका कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: Orchard will grow in 111 hectares in Washim taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.