केवळ २०० रुग्णालयांचीच नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:10 IST2021-01-08T06:10:10+5:302021-01-08T06:10:10+5:30
वैद्यकीय क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित डाॅक्टरांना खासगी रुग्णालय उभारण्यापूर्वी बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार आरोग्य विभागाकडे नोंदणी ...

केवळ २०० रुग्णालयांचीच नोंदणी
वैद्यकीय क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित डाॅक्टरांना खासगी रुग्णालय उभारण्यापूर्वी बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीशिवाय खासगी रुग्णालय थाटता येत नाही. वाशिम शहरात जवळपास १३० खासगी रुग्णालयांची नोंदणी झालेली आहे. अन्य तालुक्यात हे प्रमाण २० च्या आत आहे. वाशिमचा अपवाद वगळता अन्य तालुक्यात नोंदणीकृत खासगी रुग्णालयांचे प्रमाण कमी असल्याने आरोग्य विभागातर्फे पडताळणी मोहीम राबविणे गरजेचे ठरत आहे.
०००
वैद्यकीय क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित डाॅक्टरांना खासगी रुग्णालय उभारण्यापूर्वी बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- डाॅ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम
०००
गेल्या वर्षात १८४ नोंदणी झाली
सन २०१९ मध्ये जिल्ह्यात जवळपास १८४ खासगी रुग्णालयांची नोंदणी झाली होती. यामध्ये २०२० मध्ये १६ खासगी रुग्णालयांची भर पडली. शहरी भागात शक्यतोवर नोंदणी केल्यानंतरच खासगी रुग्णालय थाटले जाते. ग्रामीण भागात नोंदणी होते की नाही याची पडताळणी होणे गरजेचे आहे.
०००
नोंदणी न केल्यास होणारी कारवाई...
नोंदणीशिवाय खासगी रुग्णालय सुरू करता येत नाही. नोंदणी न करता रुग्णालय सुरू केल्यास फाैजदारी कारवाई केली जाते.