दुचाकीच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:52 IST2021-09-16T04:52:01+5:302021-09-16T04:52:01+5:30

एमएच-२७ सीपी-६७९८ व एमएच-२९ एयू-७०४१ क्रमांकाच्या दुचाकी विरुद्ध दिशेने जात होत्या. वाकी फाट्यानजीक या दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाल्याने ...

One killed, two seriously injured in two-wheeler collision | दुचाकीच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

दुचाकीच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

एमएच-२७ सीपी-६७९८ व एमएच-२९ एयू-७०४१ क्रमांकाच्या दुचाकी विरुद्ध दिशेने जात होत्या. वाकी फाट्यानजीक या दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार असणारा एक युवक जागीच ठार झाला, तर एक मुलगा गंभीर जखमी झाला. दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जखमी झाले. याबाबतची माहिती इंझोरी गावचे पोलीस पाटील आणि सासचे अजय ढोक यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी सचिन वानखडे यांच्या गंभीर जखमी मुलास कारंजा रुग्णालयात पाठविले. नंतर श्याम सवाई यांना रुग्णवाहिका पाठविण्यास सांगितले आणि तात्काळ तीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. जखमींना कारंजा ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांत नोंद झाली नव्हती. त्यामुळे जखमींची नावे कळू शकली नाहीत.

Web Title: One killed, two seriously injured in two-wheeler collision