माेटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
By नंदकिशोर नारे | Updated: January 1, 2024 14:23 IST2024-01-01T14:23:38+5:302024-01-01T14:23:38+5:30
यामध्ये पोलीस कर्मचारी सुनिल गणेशपुरे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर प्रवीण गवांदे यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माेटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
नंदकिशाेर नारे
वाशिम : मानोरा पोलीस स्टेशन येथील कार्यरत पोलीस कर्मचारी बुलेट माेटारसायकलने मानोरा येथून कारंजाकडे जात असताना ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिराच्या दरम्यान दापूरा समोरील एका पुलाजवळ अपघात झाला. यामध्ये पोलीस कर्मचारी सुनिल गणेशपुरे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर प्रवीण गवांदे यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आपले कर्तव्य बजावून मानोरा पोलीस स्टेशन येथे नियुक्त असलेले पोलीस कर्मचारी सुमित गणेशपुरे व प्रविण गवांदे हे रविवारी बुलेट माेटारसायकलने कारंजाकडे जात होते. सदर अपघाताची घटना दापुरा येथील अमोल घोडे यांनी आपातकालीन सास कंट्रोलचे अजय ढोक यांना भ्रमणध्वनीवरून दिली असता त्यांनी घटनेची दखल घेत तात्काळ संत गाडगेबाबा रुग्ण वाहिकेचे पायलट खोंड यांना घटना स्थळी वाहनांसह पाचारण केले.
सदर अपघातातील पोलिसांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी पोलीस कर्मचारी सुनिल गणेशपुरे यांचा मृत्यु झाल्याचे जाहीर केले, तर अपघातातील दुसरा पोलीस कर्मचारी प्रवीण गवांदे हा गंभीर जखमी असल्याचे सांगितले. गवांदे यांना ताबडताेब पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले.