वाशिममध्ये ऑटो अपघातात एक ठार; आठ जखमी
By नंदकिशोर नारे | Updated: May 9, 2023 16:52 IST2023-05-09T16:51:45+5:302023-05-09T16:52:06+5:30
जखमींमध्ये दोघांची प्रतिकृती चिंताजनक असून, सर्व जखमींना वाशीम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

वाशिममध्ये ऑटो अपघातात एक ठार; आठ जखमी
वाशिम : रिसोड तालुक्यातील सवड येथे ऑटाे अपघातात एकजण ठार, तर आठजण जखमी झाल्याची घटना ८ मे राेजी रात्री ९ वाजतादरम्यान घडली.
एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यांतर्गत येत असलेल्या ग्राम सोनुना येथील काही ग्रामस्थ एका तीन चाकी ऑटोमध्ये बसून रिसोडकडे येत असताना ऑटोसमोर रानडुक्कर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व ऑटो रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या घटनेत लक्ष्मीबाई अंबादास वाठोरे (वय ५२) महिलेचा मृत्यू झाला असून, आठजण जखमी झाले जखमींमध्ये दोघांची प्रतिकृती चिंताजनक असून, सर्व जखमींना वाशीम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
चालक आशिष वाठोरे (वय २२), प्रकाश दौलत वाठोरे (वय ३०), साळुंकाबाई अनिल वाठोरे (वय ३५) , शोभा मदन शेटाणे (वय ४१), सत्यभामा वाठोरे (वय ४५ ), मदन सत्यभान शेटाणे (वय ४५), प्रीतम अनिल वाठोरे (वय ९) ,कमळबाई अरुण शेटाणे (वय ४०), सत्यभामा भीमराव कंकाळ (वय ५०) असे जखमींचे नाव आहे. सदर घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष राठोड, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत सरकटे, चालक नंदकिशोर पाटील, संदीप सोनटक्के, सलीम रेघीवाले व होमगार्ड संतोष सराफ यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना पोलीस वाहनातून येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.