दूचाकी अपघातात एक इसम ठार
By Admin | Updated: July 20, 2014 22:56 IST2014-07-20T22:56:13+5:302014-07-20T22:56:13+5:30
फाळेगाव चौफूलीलगत एका झाडाला दूचाकीची धडक लागल्याने दूचाकीस्वार जागीच ठार

दूचाकी अपघातात एक इसम ठार
धानोरा खूर्द : येथून जवळच असलेल्या शेंदूरजनाकडे जाणार्या मार्गावर फाळेगाव चौफूलीलगत एका झाडाला दूचाकीची धडक लागल्याने दूचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १९ जूलै रोजी घडली. याबाबत अधिक माहितीनुसार मंगरुळपीर तालुक्यातीलच भडकूंभा येथील दूर्गादास विष्णूदास जाधव हा ३५ वर्षीय इसम दूचाकी क्रमांक एम. एच. ३७ एफ. ५१९५ ने मंगरुळपीरचा बाजार करुन गावी परतत होता. धानोरा खूर्दपासून जवळच असलेल्या शेंदूरजना मार्गावरील फाळेगाव चौफूलीजवळ भरधाव वेगाने जाणारी त्याची दूचाकी रस्त्यालगतच्या झाडावर जाउन आदळल्याने दूर्गादास जाधव हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच आसेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा व इतर सोपस्कार पार पाडून पोलिसांनी याप्रकरणी कलम २७९, ३0४ नुसार गुन्हा दाखल केला. या अपघातप्रकरणाचा पूढील तपास ठाणेदार शिवाजीराव लष्करे यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय ढोके व जमादार अनिरुध्द भगत करीत आहेत.