अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:17 IST2017-09-18T19:16:24+5:302017-09-18T19:17:08+5:30
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मंगरूळपीर येथील सुरेश खराटे हे जखमी झाल्याची घटना मंगरूळपीर ते शेलुबाजार या मार्गावरील पार्डीताड फाटा ते हिसई दरम्यान सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जखमी
ठळक मुद्देमंगरूळपीर ते शेलुबाजार मार्गावरील घटना जखमी मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
पार्डी ताड (वाशिम) : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मंगरूळपीर येथील सुरेश खराटे हे जखमी झाल्याची घटना मंगरूळपीर ते शेलुबाजार या मार्गावरील पार्डीताड फाटा ते हिसई दरम्यान सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.
पार्डी ताड येथील युवक सोमवारी सकाळच्या सुमारास धावण्याचा सराव करण्यासाठी पार्डीताड फाटा ते हिसई या दरम्यानच्या रस्त्यावर गेली असता, त्यांना सुरेश खराटे ह ेरस्त्यावर जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मंगरूळपीर पोलीस स्टेशनला देण्यात आली. पार्डी येथील युवकांनी सदर जखमीला मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.