नदीच्या पुलावरुन पडून एकाचा मृत्यू

By Admin | Updated: May 24, 2017 01:51 IST2017-05-24T01:51:17+5:302017-05-24T01:51:17+5:30

कनेरगाव: येथील पैनगंगा नदीच्या पुलावरुन पडल्याने मोईन खा कौसर खा पठाण (३५) रा.नर्सी टि पॉर्इंट हिंगोली याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २३ मे रोजी उघडकीस आली.

One dies on the river bridge and dies | नदीच्या पुलावरुन पडून एकाचा मृत्यू

नदीच्या पुलावरुन पडून एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
कनेरगाव: येथील पैनगंगा नदीच्या पुलावरुन पडल्याने मोईन खा कौसर खा पठाण (३५) रा.नर्सी टि पॉर्इंट हिंगोली याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २३ मे रोजी उघडकीस आली.
येथील पैनगंगा नदीच्या पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलीस चौकीला मिळाली. यावरून पोलीस कर्मचारी सुनील खिल्लारे, श्याम खुळे, मोहन धाबे यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनास्थळ हे वाशिम हद्दीत असल्याने वाशिम ग्रामीणला माहिती दिली. यावरून वाशिम येथून आलेल्या पोलीस पथकाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशिम येथे हलविला. मृताच्या खिशामध्ये असलेल्या मोबाइलवरून त्याचे नातेवाइकाला फोन करून माहिती दिली. हा प्रकार घातपात आहे की आत्महत्या? या दृष्टिने तपास सुरू आहे.

Web Title: One dies on the river bridge and dies