सर्पदंशाने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:47 IST2021-08-17T04:47:57+5:302021-08-17T04:47:57+5:30
घरामध्ये झोपेत असताना मण्यार जातीच्या सापाने पंजाबबाबा यांना दंश केला. घरातील मंडळीने मेडशी येथील आरोग्यवर्धिनी येथे उपचारासाठी नेले. ...

सर्पदंशाने एकाचा मृत्यू
घरामध्ये झोपेत असताना मण्यार जातीच्या सापाने पंजाबबाबा यांना दंश केला. घरातील मंडळीने मेडशी येथील आरोग्यवर्धिनी येथे उपचारासाठी नेले. येथील वैद्यकीय अधिकारी यांनी अकोला येथे रेफर करण्याचे सांगितले. उपचारासाठी अकोला येथे जात असताना मध्येच पंजाब पवार यांची प्राणज्योत मावळली. दरम्यान, गाव परिसरातील चार ते पाच जणांनादेखील सापाने दंश केला. सोमवारी सकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान त्याच परिसरात अन्नपूर्णा विष्णू करवते यांना सापाने दंश केला. त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे नेले. नम्रता करवते यांनादेखील काहीतरी चावले. पण, नम्रता यांना काय चावले, हे न दिसल्याने त्यांनादेखील अकोला येथे उपचारासाठी पाठविले. रविवारी याच परिसरात पुष्पा प्रशांत कडू यांना पण सापाचा दंश झाल्याने अकोला येथे उपचारासाठी नेले. याच परिसरात चारपाच दिवस अगोदर अनिल नवले यांच्या पत्नीला सापाचा दंश झाल्याने उपचारासाठी अकोला येथे भरती केले होते. या सर्व घटनेमुळे मेडशी येथे सापाची दहशत निर्माण झाली आहे.