ई-पीक पाहणीच्या नोंदणीपासून दीड लाखावर शेतकरी दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST2021-09-11T04:42:41+5:302021-09-11T04:42:41+5:30
ई-पीक पाहणीमध्ये मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्वतः शेतातील पिकांची नोंद करू शकणार आहेत. त्यामुळे गावनिहाय पिकांची अचूक आकडेवारी उपलब्ध होणार ...

ई-पीक पाहणीच्या नोंदणीपासून दीड लाखावर शेतकरी दूरच
ई-पीक पाहणीमध्ये मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्वतः शेतातील पिकांची नोंद करू शकणार आहेत. त्यामुळे गावनिहाय पिकांची अचूक आकडेवारी उपलब्ध होणार आहे. शेतकरी प्रत्यक्ष शेतात जाऊन मोबाईल ॲपद्वारे पिकांचे फोटो अपलोड करु शकतील, या ॲपमध्ये त्या क्षेत्राच्या अक्षांश व रेखांशाची नोंद होणार आहे. शेतकऱ्यांकडून नोंदविण्यात आलेल्या माहितीची तलाठ्यांमार्फत पडताळणी करून त्याची नोंद सातबारा उताऱ्यामध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे हा उपक्रम महत्त्वाकांक्षी मानला जात आहे. असे असले तरी अनेक गोरगरीब शेतकऱ्यांकडे अद्यापही ॲन्ड्राॅईड मोबाईल नाहीत, ते कसे हाताळायचे, याची जाण त्यांना नाही. ग्रामीण भागात मोबाईलच्या नेटला पुरेशी गती मिळत नाही. पिकांचे फोटो काढलेही जातील; मात्र ते मोबाईल ॲपव्दारे अपलोड कसे करायचे, या प्रश्नाने अनेक शेतकऱ्यांना ग्रासले आहे. त्यामुळे अद्याप १ लाख ६९ हजार ९८० शेतकरी नोंदणीपासून दूर असल्याचे बोलले जात आहे.
.......................
जिल्हाधिकारी स्वत: घेताहेत आढावा
ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतपिकांच्या नोंदणीची मोहीम गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. हे स्वतः वाशिम, मालेगाव, मंगरुळपीर तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोहिमेचा आढावा घेत आहेत. हे ॲप वापरण्याविषयी शेतकऱ्यांना काही अडचणी येत असल्यास त्यांनी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
.................
२,७२,९८०
जिल्ह्यातील एकूण शेतकरी
१,०३,६८८
ई-पीक पाहणी ॲपवर झालेली नोंदणी
............
तालुकानिहाय नोंदणीची आकडेवारी
वाशिम - १७०७९
रिसोड - २०५८४
मालेगाव - १३६७०
मंगरुळपीर - १५४४९
कारंजा - २४५६१
मानोरा - १२३४५