शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

‘ओएमआर’ मशीन बदलामागे गौडबंगाल

By admin | Updated: November 22, 2014 02:23 IST

वाशिम जिल्हा परिषद पदभरती : उत्तरपत्रिका तपासणीत संभ्रम, एजंटच निवडतोय उमेदवार.

धनंजय कपाले/वाशिमएका पदभरतीनंतर उत्तरपत्रिका तपासणी करणार्‍या ह्यओएमआरह्ण मशिनचे कंत्राट लागलीच दुसर्‍याच एजन्सीला आणि तेही चढय़ा दराने दिल्याने, जिल्हा परिषदेच्या पदभरतीमधील गौडबंगाल चव्हाट्यावर येत आहे. वाशिम जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणार्‍या परीक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून तपासणीचे कंत्राट प्रथम ह्यसिग्माह्ण या एजन्सीला देण्यात आले होते. एका पदभरतीचा पेपर झाल्यानंतर लागलीच दुसर्‍या एजन्सीला ह्यओएमआरह्ण मशिनचे कंत्राट देण्यात आले. १0 नोव्हेंबर रोजी उत्तरपत्रिका तपासताना पहिल्या एजन्सीच्या एजंटने गोंधळ घातल्याची बाब समोर करून, ऐनवेळेवर उत्तरपत्रिका तपासणीचे कंत्राट यवतमाळच्या दुसर्‍या एजन्सीला देण्यात आल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या ११३ रिक्त जागेसाठी २ नोव्हेंबर पासुन परिक्षा घेण्यात येत आहेत. या परिक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून तपासणी करण्याचा कंत्राट मुंबई येथील ह्यसिग्माह्ण कंपनीला देण्यात आला होता. या कंपनीने केवळ एक रूपये नव्वद पैशांमध्ये उत्तपत्रिका स्कॅन करून तपासणी करण्याचा सर्वात कमी मोबदला निविदामध्ये मागितल्याने जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी सिग्मा कंपनीला कंत्राट देण्यावर शिक्कामोर्तब केले. पदभरतीदरम्यान ९ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम १0 नोव्हेंबर रोजी सुरू झाले. मात्र, उत्तरपत्रिकेमध्ये अफरातफर केल्याचा संशय आल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी सदर बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणुन दिली. वरिष्ठांनी लगेच सिग्मा कंपनीच्या पुढील कामावर निर्बंध लावले. यानंतर यवतमाळ येथील एका ओएमआर कंपनीला १0 नोव्हेंबर नंतरच्या पार पडणार्‍या परिक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून तपासणीचे काम युध्दपातळीवर देण्यात आले. मात्र, या कंपनीला शासनाने दुप्पट तिप्पट नव्हे तर तब्बल आठ पटीने अर्थात १६ रूपये ९0 पैशाने मोबदला देण्याचे शौर्य दाखविले. जिल्हाधिकारी कार्यालयाने ज्यावेळी उत्तपत्रिका तपासणीचे काम करण्यासाठी ओएमआर कंपनीला निविदा मागितल्या त्यावेळी अंदाजे दहा ते बारा कंपनीच्या निविदा आल्या होत्या. यवतमाळच्या एजन्सी पेक्षा चार ते पाच एजन्सी कमी दरामध्ये काम करण्यास ईच्छुक होत्या. मात्र, यवतमाळचीच एजन्सी का निवडण्यात आली. हा प्रश्न अनुत्तरीत आहे.