‘ओएमआर’ मशीन बदलामागे गौडबंगाल

By Admin | Updated: November 22, 2014 02:23 IST2014-11-22T02:23:53+5:302014-11-22T02:23:53+5:30

वाशिम जिल्हा परिषद पदभरती : उत्तरपत्रिका तपासणीत संभ्रम, एजंटच निवडतोय उमेदवार.

The 'OMR' machine behind the Godbangal | ‘ओएमआर’ मशीन बदलामागे गौडबंगाल

‘ओएमआर’ मशीन बदलामागे गौडबंगाल

धनंजय कपाले/वाशिम
एका पदभरतीनंतर उत्तरपत्रिका तपासणी करणार्‍या ह्यओएमआरह्ण मशिनचे कंत्राट लागलीच दुसर्‍याच एजन्सीला आणि तेही चढय़ा दराने दिल्याने, जिल्हा परिषदेच्या पदभरतीमधील गौडबंगाल चव्हाट्यावर येत आहे.
वाशिम जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणार्‍या परीक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून तपासणीचे कंत्राट प्रथम ह्यसिग्माह्ण या एजन्सीला देण्यात आले होते. एका पदभरतीचा पेपर झाल्यानंतर लागलीच दुसर्‍या एजन्सीला ह्यओएमआरह्ण मशिनचे कंत्राट देण्यात आले. १0 नोव्हेंबर रोजी उत्तरपत्रिका तपासताना पहिल्या एजन्सीच्या एजंटने गोंधळ घातल्याची बाब समोर करून, ऐनवेळेवर उत्तरपत्रिका तपासणीचे कंत्राट यवतमाळच्या दुसर्‍या एजन्सीला देण्यात आल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या ११३ रिक्त जागेसाठी २ नोव्हेंबर पासुन परिक्षा घेण्यात येत आहेत. या परिक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून तपासणी करण्याचा कंत्राट मुंबई येथील ह्यसिग्माह्ण कंपनीला देण्यात आला होता. या कंपनीने केवळ एक रूपये नव्वद पैशांमध्ये उत्तपत्रिका स्कॅन करून तपासणी करण्याचा सर्वात कमी मोबदला निविदामध्ये मागितल्याने जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी सिग्मा कंपनीला कंत्राट देण्यावर शिक्कामोर्तब केले. पदभरतीदरम्यान ९ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम १0 नोव्हेंबर रोजी सुरू झाले. मात्र, उत्तरपत्रिकेमध्ये अफरातफर केल्याचा संशय आल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी सदर बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणुन दिली. वरिष्ठांनी लगेच सिग्मा कंपनीच्या पुढील कामावर निर्बंध लावले. यानंतर यवतमाळ येथील एका ओएमआर कंपनीला १0 नोव्हेंबर नंतरच्या पार पडणार्‍या परिक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून तपासणीचे काम युध्दपातळीवर देण्यात आले. मात्र, या कंपनीला शासनाने दुप्पट तिप्पट नव्हे तर तब्बल आठ पटीने अर्थात १६ रूपये ९0 पैशाने मोबदला देण्याचे शौर्य दाखविले. जिल्हाधिकारी कार्यालयाने ज्यावेळी उत्तपत्रिका तपासणीचे काम करण्यासाठी ओएमआर कंपनीला निविदा मागितल्या त्यावेळी अंदाजे दहा ते बारा कंपनीच्या निविदा आल्या होत्या. यवतमाळच्या एजन्सी पेक्षा चार ते पाच एजन्सी कमी दरामध्ये काम करण्यास ईच्छुक होत्या. मात्र, यवतमाळचीच एजन्सी का निवडण्यात आली. हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Web Title: The 'OMR' machine behind the Godbangal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.