वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 16:37 IST2019-05-27T16:36:11+5:302019-05-27T16:37:03+5:30
७५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ मे रोजी दुपारी १.३० वाजता उघडकीस आली.

वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : येथील मोमिनपुरा भागातील ७५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ मे रोजी दुपारी १.३० वाजता उघडकीस आली. अब्दुल गनी अब्दुल कादर असे मृतकाचे नाव आहे. रिसोड शहरातील मोमीनपुरा भागातील अब्दुल गनी अब्दुल कादर हे फळविक्रेते असून, २७ मे रोजी रिसोड ते लोणी मार्गावरील साखरा फाटा पासुन काही अंतरावर लिंबाच्या झाडाच्या फांदीला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वाटसरूंनी मृतकाच्या नातेवाईकांना माहिती दिली. मृतक अब्दुल गनी अब्दुल कादर यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली आहेत. आत्महत्येचे कारण कळु शकले नाही. रिसोड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.