विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा
By Admin | Updated: October 29, 2014 23:59 IST2014-10-29T23:59:01+5:302014-10-29T23:59:01+5:30
जोगेश्वरी येथील घटना, पतीस अटक.

विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा
शिरपूरजैन (वाशिम): जोगेश्वरी येथे एका २0 वर्षीय विवाहितेला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्या सासरच्या चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पतीला अटक केली.
शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या जोगेश्वरी येथील शैलेश विनायक डोळस यांची बहीण मयुरीचा विवाह गावातील रवि परमेश्वर खराटे यांच्याशी मे २0१४ मध्ये झाला. विवाहाच्या काही दिवसानंतर सासरच्या मंडळीकडून माहेरहून पैसे आणण्यासाठी मयुरीला शारिरिक व मानसिक त्रास देण्यात येऊ लागला. दरम्यान २५ ऑक्टोबर रोजी मयुरीला सासरच्या लोकांनी जबरीने विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मयुरीच्या भावाने मयुरीचा पती रवि खराटे, सासू गिता खराटे, सासरा पांडुरंग खराटे, दीर विवेक खराटे यांच्या विरुद्ध २६ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली असून, शिरपूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंवि कलम ४८९, ३0७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.