शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

आता १ लाखापर्यंत थेट कर्ज योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:50 IST

वाशिम : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील पात्र लाभार्थींना आता लघु उद्योग उभारण्यासाठी २५ हजार रुपयांऐवजी १ लाख रुपयापर्यंत थेट कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील पात्र लाभार्थींना आता लघु उद्योग उभारण्यासाठी २५ हजार रुपयांऐवजी १ लाख रुपयापर्यंत थेट कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. २१ डिसेंबर रोजीच्या शासन आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय यंत्रणेला मिळालेल्या आहेत.अनुसूचित जाती प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २५ हजार रुपयाचे कर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून देण्याची योजना राबविण्यात येत आहे. लहान उद्योगांसाठी लागणाºया भांडवली वस्तू तसेच पायाभूत गुंतवणुकीतील वाढ, कच्चा माल दरवाड व सतत होणारी महागाई निर्देशांकातील वाढ पाहता अनुसूचित जातीच्या जास्तीत जास्त लोकांना कर्ज योजनांचा लाभ घेता यावा आणि महामंडळाच्या योजना प्रभावीपणे राबविता याव्यात या दृष्टिकोनातून थेट कर्ज योजनेंतर्गत कर्जाची मर्यादा २५ हजार रुपयांऐवजी २१ डिसेंबरच्या शासन निर्णयानुसार एक लाख रुपये करण्यात आली आहे. कर्ज योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून दोन हप्त्यात कर्जाची रक्कम दिली जाणार आहे. महामंडळाचा सहभाग (४ टक्के व्याजदराने) ८५ हजार रुपये, अनुदान १० हजार रुपये, लाभार्थी हिस्सा पाच हजार रुपये असे एक लाख रुपये मिळणार आहेत. तीन वर्षात कर्जाची परतफेड करावी लागणार असून, पहिला हप्ता ७१ हजार २५० रुपये आणि प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर साधारणत: तीन महिन्यानंतर क्षेत्रीय अधिकाºयांनी केलेल्या तपासणी अभिप्रायानुसार २३ हजार ७५० रुपये असा दुसरा हप्ता दिला जाणार आहे. मागासवर्गीय घटकातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, बँकेमार्फत कर्ज देताना येणाºया अडचणी व कर्ज मंजूर होताना होणारा विलंब टाळणे, लघु व्यवसाय करण्यासाठी तात्काळ वित्त पुरवठा करणे आदी उद्देशातून सदर योजना राबविण्यात येत आहे.या लघु उद्योगांसाठी मिळणार कर्जमोबाईल सर्व्हिसिंग व रिपेअरिंग, इलेक्ट्रीशीयन, इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअरिंग, ब्यूटीपार्लर, ड्रेस डिझायनिंग, टेलरिंग, फुड प्रॉडक्टस व प्रोसेसिंग, किराणा दुकान, जनरल व स्टेशनरी स्टोअर, मेडीकल स्टोअर, हार्डवेअर, वेल्डींग व सॅनेटरी शॉप, प्रिंटींग, शिवणकला, झेरॉक्स, हॉटेल, फास्ट फुड किंवा ज्यूस सेंटर, क्लॉथ व रेडीमेड गारमेंट शॉप, शेतीशी निगडीत पुरक व्यवसाय आदींसाठी वित्त पुरवठा केला जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिम