पेन्शन परतीच्या नोटिसीला करदात्या शेतकऱ्यांचा ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:30 IST2021-05-29T04:30:12+5:302021-05-29T04:30:12+5:30
जिल्ह्यात पीएम किसान पेन्शन योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकरी लाभार्थींची एकूण संख्या १ लाख ९९ हजार ३८० आहे. त्यापैकी १५ ...

पेन्शन परतीच्या नोटिसीला करदात्या शेतकऱ्यांचा ठेंगा
जिल्ह्यात पीएम किसान पेन्शन योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकरी लाभार्थींची एकूण संख्या १ लाख ९९ हजार ३८० आहे. त्यापैकी १५ हजार १६६ जण करदाते असल्याची बाब पडताळणीत उघड झाली. शासनाच्या आदेशानुसार संबंधितांना देण्यात आलेले पेन्शनचे पैसे वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे. याअंतर्गत १७२७ जणांकडून १ कोटी ६५ लाख ५२ हजार रुपये वसूल झाले आहेत; मात्र उर्वरित १३ हजार ४३९ जणांकडून अद्यापपर्यंत पैसे वसूल झालेले नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.
.....................
पीएम किसन पेन्शन योजनेचा आढावा
पीएम किसन पेन्शन योजनेचे लाभार्थी
१,९९,३८०
पैसे परत करा म्हणून नोटीस पाठविलेले शेतकरी
१५,१६६
आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी
१७२७
पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी
१३,४३९
.....................
आतापर्यंत १.६५ कोटी वसूल
प्रधानमंत्री किसान पेन्शन योजनेसाठी जिल्ह्यातील एकूण १ लाख ९९ हजार ३८० शेतकरी पात्र ठरले.
संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला व दुसरा हप्त्याची रक्कम वर्ग केल्यानंतर १५ हजार १६६ शेतकरी करदाते असल्याची बाब निष्पन्न झाली.
शासनाच्या आदेशावरून प्रशासकीय यंत्रणेकडून संबंधित अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करणे सुरू आहे. याअंतर्गत आतापर्यंत १ कोटी ६५ लाख ५२ हजारांची रक्कम वसूल झाली आहे.
......................
अनेक शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही
प्रधानमंत्री किसान पेन्शन योजनेंतर्गत वर्षाला तीन हप्त्यात सहा हजार रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा केले जातात. त्यासाठी चोख पडताळणी केली जात आहे. दरम्यान, बँक खात्यांमध्ये त्रुटी असणे, आधार अपडेट नसणे यासह इतर कारणांमुळे १७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत योजनेचा लाभ घेता आलेला नाही. संबंधितांच्या प्रस्तावांमधील त्रुटी दूर करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असल्याची माहिती मिळाली.
............................
कोट :
जिल्ह्यातील १ लाख ९९ हजार ३८० शेतकरी प्रधानमंत्री किसान पेन्शन योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत. त्यापैकी १५ हजार १६६ लाभार्थी करदाते असल्याचे सिद्ध झाले. संबंधितांकडून रक्कम वसुलीचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असून १७२७ जणांकडून पैसे वसूल करण्यात आले आहेत.
- शंकर तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम