‘नॉन-कोविड’ रुग्णांना मिळणार घरपोच उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 04:30 PM2020-06-07T16:30:15+5:302020-06-07T16:30:24+5:30

वेळेवर उपचार मिळावे याकरीता त्यामुळे आरोग्य विभागाने अ‍ॅक्शन प्लॅन आखला आहे.

Non-covid patients will get home treatment! | ‘नॉन-कोविड’ रुग्णांना मिळणार घरपोच उपचार!

‘नॉन-कोविड’ रुग्णांना मिळणार घरपोच उपचार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पावसाळ्यात ग्र्रामीण भागात साथरोग उद्भवल्यास तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये वैद्यकीय पथके स्थापन करून ‘नॉन-कोविड’ रुग्णांना घरोघरी जावून उपचार व औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी ३ जून रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या आढावा सभेत केल्या होत्या. या सुचनेची अंमलबजावणी भोयणी, दादगाव येथून ५ जूनपासून सुरू झाली असून, यापुढेही अधिक दक्षता घेतली जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
आगामी पावसाळ्याच्या काळात कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराचे रुग्णसुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा रुग्णांवर वेळेवर उपचार मिळावे याकरीता त्यामुळे आरोग्य विभागाने अ‍ॅक्शन प्लॅन आखला आहे. ग्रामीण भागात व प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये वैद्यकीय पथके स्थापन करून ‘नॉन-कोविड’ रुग्णांना घरोघरी जावून उपचार व औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विशेषत: वृद्ध रुग्णांवर विशेष वॉच राहणार असून, वयोवृद्ध नागरिकांनीदेखील विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
 
आरोग्य केंद्रामध्ये औषधी साठा उपलब्ध
साथरोग निर्माण झाल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, या पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार आढावा घेऊन आवश्यक तो औषधी साठा आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध केला जाणार आहे.

Web Title: Non-covid patients will get home treatment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.