आठ दिवसात एकाही विद्यार्थ्याला कोरोना संसर्ग नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST2021-02-06T05:16:35+5:302021-02-06T05:16:35+5:30
वाशिम : पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला असून, या दरम्यान एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग ...

आठ दिवसात एकाही विद्यार्थ्याला कोरोना संसर्ग नाही !
वाशिम : पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला असून, या दरम्यान एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे दिलासादायक चित्र आहे.
देशात मार्च २०२०पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. दरम्यान, कोरोनाचा आलेख खाली आल्याने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे तर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. नववी ते बारावीतील एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला आहे. या दरम्यान एकाही विद्यार्थ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही. जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ८०६ शाळा असून, येथे ८१ हजार ५१८ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेत ३,९०१ शिक्षक आणि १,३२८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने आणि शाळांमध्ये कोरोनाविषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीदेखील वाढत आहे.