रस्ते डागडुजीकडे न. पं. चे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:42 IST2021-07-30T04:42:47+5:302021-07-30T04:42:47+5:30
रस्त्याची कामे रखडलेलेच वाशिम : मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारात पाणंद रस्त्यांच्या कामाला सहा महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली, परंतु अपुऱ्या निधीमुळे ...

रस्ते डागडुजीकडे न. पं. चे दुर्लक्ष
रस्त्याची कामे रखडलेलेच
वाशिम : मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारात पाणंद रस्त्यांच्या कामाला सहा महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली, परंतु अपुऱ्या निधीमुळे या रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नाहीत.
बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी खंडित
वाशिम : गत काही दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेडच्या इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे आपले सरकार केंद्रांतील कामे खोळंबून त्रास सहन करावा लागत आहे.
लाईनमनची पदे रिक्त
वाशिम : मेडशी महावितरण कार्यालयात लाईनमनची तीन पदे रिक्त आहेत. या केंद्रांतर्गत घरगुती आणि शेतकरी मिळून १,३०० ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी एकच लाईनमन आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.
बहरलेल्या पिकांना खताची मात्रा
वाशिम : समाधानकारक पाऊस झाल्याने संकटात सापडलेली खरीप हंगामातील पिके बहरली आहेत. दर्जेदार उत्पन्न मिळण्याची अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी या पिकांना युरिया खताची मात्रा देणे सुरू आहे.