No masks, no physical distractions at Risod Bus Stand | रिसोड येथील बसस्थानकात ‘ ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग’

रिसोड येथील बसस्थानकात ‘ ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग’

 लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड :  दिवाळीनंतरही रिसोड येथील बसस्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या जात आहे. रिसोड येथील बसस्थानकावर अनेक प्रवाशी विनामास्क तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याने मंगळवारी दिसून आले.
दिवाळीदरम्यान रिसोडसह जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. दिवाळीनंतर गर्दी ओसरेल अशी म्हटले जात होते. 
परंतू, रिसोड बसस्थानकामध्ये अद्यापही गर्दी कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने नागरिकांनी मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. परंतू, बसस्थानकात ना मास्कचा वापर ना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन’ असे चित्र आहे.

Web Title: No masks, no physical distractions at Risod Bus Stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.