शिकवणी वर्गांचे फायर आॅडिट  झालेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 04:00 PM2019-08-12T16:00:30+5:302019-08-12T16:00:45+5:30

नगर परिषदांनी कुठलाही विशेष पुढाकार न घेतल्याने एकाही शिकवणी वर्गाचे फायर आॅडिट अद्यापपर्यंत झालेले नाही.

No fire audit of coaching classes! | शिकवणी वर्गांचे फायर आॅडिट  झालेच नाही!

शिकवणी वर्गांचे फायर आॅडिट  झालेच नाही!

Next

- सुनील काकडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सुरत येथे २४ मे २०१९ रोजी एका बहुमजली शिकवणी वर्गाच्या इमारतीला लागलेल्या आगीत २२ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला. यासारखी घटना वाशिम जिल्ह्यातही घडू शकते. त्यामुळे सर्व शिकवणी वर्गांचे फायर आॅडिट करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी २६ जून २०१९ ला दिले होते; मात्र नोटीस बजावण्यापुरता हा विषय मर्यादित असून, नगर परिषदांनी कुठलाही विशेष पुढाकार न घेतल्याने एकाही शिकवणी वर्गाचे फायर आॅडिट अद्यापपर्यंत झालेले नाही.
वाशिम जिल्ह्यातील सहाही शहरांमध्ये दहावी ते बारावीच्या शिकवणी वर्गासह नीट, जेईई यासारख्या अभ्यासक्रमांचे शिकवणी वर्गही चालविले जातात. विद्यार्थ्यांच्या गर्दीने सदोदित भरून राहणाºया या शिकवणी वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्याची चांगली व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी, सुसज्ज स्वच्छतागृह असण्यासोबतच कधीकाळी आगीची घटना घडल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी शिकवणी वर्गाच्या परिसरात अग्निअवरोधक यंत्र लावलेले असणे गरजेचे आहे. याशिवाय इमारत परिसरात मोकळी जागा, संकटकालिन परिस्थितीत विद्यार्थ्यांना तत्काळ बाहेर पडता येण्यासाठी स्वतंत्र पायºया, मोकळा पार्किंग परिसर असणे अत्यावश्यक आहे. या सर्व सुविधा जिल्ह्यातील शिकवणी वर्गांमध्ये अस्तित्वात आहेत किंवा नाही, याची चाचपणी आणि फायर आॅडिट करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी २६ जून २०१९ रोजी दिले होते.
दरम्यान, जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मंगरूळपीर, कारंजा नगर परिषद आणि मालेगाव, मानोरा नगर पंचायतीने त्यांच्या कार्यक्षेत्रातील शिकवणी वर्गांना नोटीस बजावून फायर आॅडिट करून घ्यावे व त्याचा अहवाल एका महिण्यात सादर करावा, अशा सूचना दिल्या होत्या; मात्र हा विषय एवढ्यापुरताच मर्यादित राहिला असून प्रशासनाकडून ठोस पाठपुरावा झाल्याने शिकवणी वर्गांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व शिकवणी वर्गांचे विनाविलंब फायर आॅडिट करण्याचे निर्देश नगर परिषदांना देण्यात आले होते. त्याचे अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. नगर परिषदांनी त्याची दखल घेतली किंवा नाही, याबाबतची माहिती घेतली जाईल. कुचराई झाल्यास मुख्याधिकाऱ्यांना नियमानुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल.
- ऋषीकेश मोडक
जिल्हाधिकारी, वाशिम


शिकवणी वर्गांचे फायर आॅडिट करण्यासंबंधी जिल्हाधिकाºयांचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्याकडे निश्चितपणे दुर्लक्ष झाले; परंतु १५ आॅगस्टनंतर प्रभावी मोहीम हाती घेवून केवळ शिकवणी वर्गच नव्हे; तर व्यापारी संकुले, दवाखाने यासह नागरिकांची सदोदित वर्दळ असणाºया ठिकाणांचे फायर आॅडिट केले जाईल.
- अशोक हेडा
नगराध्यक्ष, वाशिम


जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानंतर रिसोड शहरातील सर्व शिकवणी वर्गांना फायर आॅडिट करण्यासंबंधी नोटिस देण्यात आल्या होत्या. त्याचे अहवाल सादर करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली होती. ती आता संपली असून सर्व शिकवणी वर्गांचा मंगळवारपासून आढावा घेण्यात येणार आहे.
- गणेश पांडे
मुख्याधिकारी, रिसोड

Web Title: No fire audit of coaching classes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.