वाशिम जिल्ह्यात पाचव्यांदा आढळला नाही एकही कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 18:43 IST2021-09-05T18:43:48+5:302021-09-05T18:43:54+5:30
Corona Cases in Washim : रविवार ६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही.

वाशिम जिल्ह्यात पाचव्यांदा आढळला नाही एकही कोरोना रुग्ण
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून, रविवार ६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही. एकही रुग्ण आढळून न येण्याची ही पाचवी वेळ आहे. रविवारी एका जणाने कोरोनावर मात केली.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. गत दोन दिवसांत दहा रुग्ण आढळून आल्याने काही अंशी चिंताही वर्तविली जात होती. दरम्यान, रविवारी एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. एका जणाने कोरोनावर मात केल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,७२३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून टळलेला नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
१६ सक्रिय रुग्ण
रविवारच्या अहवालानुसार नवीन एकही रुग्ण आढळून आला नाही तर एकाने कोरोनावर मात केली. सध्या गृहविलगीकरणात १६ रुग्ण असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.