आणखी नऊ कोरोनामुक्त; चार पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:34 IST2021-07-25T04:34:32+5:302021-07-25T04:34:32+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले ...

Nine more corona-free; Four positives! | आणखी नऊ कोरोनामुक्त; चार पॉझिटिव्ह !

आणखी नऊ कोरोनामुक्त; चार पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. शनिवारी नव्याने चार रुग्ण आढळून आले, तर नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रिसोड, कारंजा व मानोरा तालु्क्याचा अपवाद वगळता उर्वरित तीन तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१६३७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०,९५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

००००

तीन तालुके निरंक

शनिवारच्या अहवालानुसार वाशिम, मंगरूळपीर व मालेगाव तालुक्यात तसेच मानोरा व रिसोड शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम शहरात सलग सातव्या दिवशीही रुग्ण आढळून आला नसल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला.

०००००००

५५ सक्रिय रुग्ण

शनिवारच्या अहवालानुसार नव्याने चार रुग्ण आढळून आले तर नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ५५ रुग्ण सक्रिय आहेत.

Web Title: Nine more corona-free; Four positives!