कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेत आढळले नवजात मृत अर्भक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 20:42 IST2017-11-19T20:28:46+5:302017-11-19T20:42:17+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील खडी या या गावालगतच्या शेतात कुत्र्याने लचके तोडलेले एक स्त्री जातीचे नवजात मृत अर्भक १९ नोव्हेंबर रोजी आढळून आले.

कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेत आढळले नवजात मृत अर्भक!
ठळक मुद्देखडी येथील प्रकारअज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम): तालुक्यातील खडी येथे स्त्री जातीचे नवजात मृत अर्भक शेतात आढळल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडी येथील पोलिस पाटील देविदास भगत यांनी १९ नोव्हेंबरला दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की गावातील गुलाब सोनोने या शेतक-याच्या शेतात स्त्री जातीचे कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेतील नवजात मृत अर्भक आढळले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुुन्हा दाखल केला आहे.