वाशिम बाजार समितीत नवीन मूग विक्रीला; पाच हजार रुपये प्रती क्विंटल दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 03:53 PM2019-08-28T15:53:25+5:302019-08-28T15:53:28+5:30

नवीन मुग विक्रीस आला असून, पाच हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला आहे.

New mung sold to Washim Bazaar Committee; Five thousand rupees per quintal rate | वाशिम बाजार समितीत नवीन मूग विक्रीला; पाच हजार रुपये प्रती क्विंटल दर

वाशिम बाजार समितीत नवीन मूग विक्रीला; पाच हजार रुपये प्रती क्विंटल दर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशीम - स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीत बुधवारी नवीन मुग विक्रीस आला असून, पाच हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला आहे. मूग आणणाºया शेतकºयाचा बाजार समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावर्षी पावसाने विलंबाने हजेरी लावल्याने मूग, उडीदाचे क्षेत्र कमालीचे घटले आहेत. त्यातही पाऊस अनियमित असल्याने उत्पादनात घट आली आहे. नवीन मूग तयार होत असून, विक्रीसाठी बाजार समितीत आणला आहे. २८ आॅगस्ट रोजी कुंभी ता.जि. वाशिम येथील शेतकरी श्रीकृष्ण तुळशिराम विळे यांनी वाशिम बाजार समितीत नवीन मूग विक्रीला आणला आहे. पाच हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला आहे. नवीन मूग खरेदीचा शुभारंभ केला असून, यावेळी बाजार समितीकडून श्रीकृष्ण विळे यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. बाजार समितीचे निरीक्षक वामन आनंदराव सोळंके यांनी नविन मूग या शेतमालाच्या राशीचे पुजन केले. यावेळी बाजार समितीचे कर्मचारी जगदीश बुंधे, रामहरी वानखेडे, राहुल चव्हाण, उमेश मापारी, सुमित गोटे, गंगा उदिवाले तसेच बाजार समितीमधील व्यापारी व आडते विठ्ठलराव गांजरे, गोविंद सारडा, गुड्डू लाहोटी, राजु चरखा, दिलीप लाहोटी, हीरा जानिवाले, निरखी महाराज व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Web Title: New mung sold to Washim Bazaar Committee; Five thousand rupees per quintal rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.