शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नववर्षात वाशिम जिल्हा विकासाला मिळावी नवी दिशा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 12:03 IST

Washim News नववर्षात जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळावी, अशी अपेक्षा जिल्हावासियांमधून व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे१ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली.रिसोडचा अपवाद वगळता उर्वरित पाच तालुक्यांच्या ठिकाणी एमआयडीसी क्षेत्र आहे. या एमआयडीसींमध्ये अद्याप एखादा मोठा उद्योग उभा राहू शकलेला नाही.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्हा निर्मितीच्या २२ वर्षांनंतरही वाशिममध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध झाल्या नसून, नववर्षात जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळावी, अशी अपेक्षा जिल्हावासियांमधून व्यक्त केली जात आहे. वाशिम-बडनेरा रेल्वे मार्ग, वैद्यकीय महाविद्यालय, बॅरेज परिसरात विद्युत जाळे, अमरावती विद्यापीठ उपकेंद्र, एमआयडीसी क्षेत्रात उद्योगधंदे, कृषीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांची उभारणी व्हावी, अशी मागणी जिल्हावासियांमधून होत आहे.दिनांक १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. मात्र, गेल्या २२ वर्षात जिल्ह्यातील सहकार, शिक्षण, कृषी, दळणवळण, औद्योगिक ही क्षेत्र विकासाचे बाळसे धरू शकलेली नाहीत. रिसोडचा अपवाद वगळता उर्वरित पाच तालुक्यांच्या ठिकाणी एमआयडीसी क्षेत्र आहे. परंतु, दळणवळणाची आणि अन्य सुविधा उपलब्ध नसल्याने या एमआयडीसींमध्ये अद्याप एखादा मोठा उद्योग उभा राहू शकलेला नाही. शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र, एनसीसी बटालियनचे कार्यालय, केंद्रीय विद्यालय इमारतीचा प्रश्न हे सरत्या वर्षातही निकाली निघू शकलेले नाहीत. केंद्रीय विद्यालय इमारत बांधकामाचे भूमिपूजन व जिल्हा स्त्री रुग्णालय इमारतीचे लोकार्पण न झाल्याने हे दोन्ही प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. वाशिम-बडनेरा रेल्वे मार्गाचा प्रश्न सर्वेक्षणाभोवतीच रेंगाळला आहे. 

कृषीमालावर आधारित प्रकल्प हवेजिल्ह्यात खरीप हंगामात साधारणत: चार लाख हेक्टर, रब्बी हंगामात ९० हजार हेक्टरवर पेरणी होते. त्यामुळे कृषीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभा राहिल्यास कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळून शेतकऱ्यांचाही विकास साधला जाईल. सोयाबीन, हरभरा या शेतमालावर आधारित उद्योगाच्या निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनाने कृषी आयुक्तालयाकडे प्रस्तावही पाठवला आहे. नववर्षात या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न साकारेल, यात शंका नाही. पैनगंगा नदीवर ११ बॅरेजेस् उभारण्यात आले. या परिसरात विद्युत जाळे निर्मितीसाठी शासनाकडून भरीव निधी मिळाला तर सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकेल.

टॅग्स :washimवाशिमMIDCएमआयडीसी