नॅझरीन चर्चला शंभर वर्षे पूर्ण
By Admin | Updated: March 15, 2015 00:44 IST2015-03-15T00:44:32+5:302015-03-15T00:44:32+5:30
शताब्दी सोहळय़ाचे आयोजन; ख्रिस्ती बांधवात उत्साहाचे वातावरण.

नॅझरीन चर्चला शंभर वर्षे पूर्ण
विश्वास वाल्ले / वाशिम : वाशिम शहराच्या मध्यभागी नंदीपेठ जवळ ख्रिस्त्री धर्माचे नॅझरीन चर्च मागील अनेक वर्षापासून उभे आहे. आज या प्रार्थनास्थळाचा १00 वष्रे पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्त येथील नासोरी येशूची मंडळींनी चर्च या शताब्दी सोहळा आयोजित केला आहे. हे चर्च सन १५ फेब्रुवारी १९९५ रोजी बांधण्यात आले आहे.
इंग्रजांच्या राजवटीतील या वास्तुचे उद्घाटन फॉक्स मेमोरिअल यांच्या हस्ते संपन्न झाले. तेव्हापासून येथील ख्रिस्त मंडळी दर रविवारी प्रार्थनेसाठी एकत्र येतात. अनेक वर्ष या चर्चवरील घंटा प्रार्थनेसाठी रविवारी सकाळी खणखणत असे. या घंटेचा आवाज रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरापर्यंत ऐकु जात होता. त्यानंतर येथील ख्रिस्ती मंडळी वाढत गेली सन १९७९ दरम्यान पुसद मार्गावर नविन चर्च बांधण्यात आले तेव्हापासून या ऐतिहासीक चर्चमध्ये नियमित प्रार्थना होत नाही. तरी अनेक धार्मिक कार्यक्रम किंवा लग्न सोहळे येथेच होतात. १00 वर्षापूर्वी वाशिम येथे इंग्रजांचे राज्य होते. त्यापूर्वीच १८७५ मध्ये मिशनेरी वाशिम येथे आले येथे शिक्षणाची अत्यल्प सोय असताना सन १९00 ते १९३५ दरम्यान पुसद मार्गावर मुला मुलींसाठी प्राथमिक शाळा सुरु केली तेथे बोर्डीगची व्यवस्था मिशनेरींनी केली होती. सन १९३५ मध्ये नॅझरीन मिशन व मॅथॉडिस्ट चर्च यांचा सर्व कारभार, चर्च, शाळा, यांचे हस्तांतर करार होऊन येथे नॅझरीन चर्च कार्यमान झाले. या चर्चच्या पहिल्या पालकाचा मान रेव्ह एस.वाय. साळवे यांनी मिळविला. त्यानंतर येथील बायबल कॉलेजमधून प्रशिक्षित झालेले लुथर मानमोठे, सुर्वातिर्थ गायकवाड व प्रभाकर भुजबळ हे पालकपदी राहिले.
या चर्चला १५ फेब्रुवारी २0१५ रोजी शंभर वर्षाचा पूर्ण काळ होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती नॅझरीन चर्च चे प्रमुख पालक प्रभाकर मानमोठे यांनी सांगितले. वाशिम शहराला आरोग्य सेवेचे प्रथम कार्य नॅझरीन चर्च ने सुरु केले सन १९३५ मध्ये रेनॉल्ड हॉस्पीटल सुरु करण्याचे ठरले होते. पण ते १९३७ मध्ये प्रत्यक्षात सुरु झाले त्यावेळी डॉ.आफी स्पायकर यांनी परिङ्म्रम घेवून ही आरोग्य सेवा सुरु केली. त्यात प्रामुख्याने महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य सेवा मिळत होती. तेव्हा वाशिमकर तथा ग्रामीण भागात या रुगणालयाला बायांचा दवाखाना म्हणत असत. पुढे सन १९४७ स्वातंत्र काळानंतर पुरुषांनाही येथे आरोग्य सेवा मिळू लागली. त्यावेळी डॉ.फॉक्स, डॉ.मिल्लर, डॉ.इव्हलीन, या अमेरिकन डॉक्टरांसह डॉ.अरुण नोव्हा, डॉ.संबर्गीकर, ही नामांकीत डॉक्टर मंडळी होती.