निसर्गाची कमाल, काकडीलाच फुटले पान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:17 IST2019-03-31T15:16:01+5:302019-03-31T15:17:04+5:30
निसर्गाचा असाच एक चमत्कार मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे पाहायला मिळाला असून, शेतकºयाने लागवड केलेल्या काकडीच्या वेलीवर लागलेल्या काकडीवरच चक्क पान उगवल्याचा प्रकार येथे घडला आहे.

निसर्गाची कमाल, काकडीलाच फुटले पान
पार्डी ताड येथील प्रकार: शेतकरीही अवाक
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: निसर्गाच्या विविध कला कोणत्या रुपात पाहायला मिळतील, ही कल्पना करणे कठीण आहे. सजीवसृष्टीत मानवाला अचंब्यात टाकण्याºया अशा अनेक नैसर्गिक घटना घडल्या आहेत. निसर्गाचा असाच एक चमत्कार मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे पाहायला मिळाला असून, शेतकºयाने लागवड केलेल्या काकडीच्या वेलीवर लागलेल्या काकडीवरच चक्क पान उगवल्याचा प्रकार येथे घडला आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील शेतकरी शंकर ठाकरे हे दरवर्षी विहिरीतील पाण्याच्या आधारे भाजीपाला पिके घेतात. वांगी, भेंडी, कोथींबीर, मेथी आदिंसह काकडीचीही लागवड ते करतात. यंदा त्यांनी त्यांच्या शेतात काकडीची लागवड केली असून, आता त्यांच्या शेतात काकड्याही फुलत आहेत. त्यांच्या याच शेतातील काकडीच्या एका वेलीवर एका काकडीलाच पान फुटले आहे. काकडीच्या खालच्या भागातून हे पान उगवले असून, ते आता चांगलेच मोठे झाले झाले आहे. हा अजब प्रकार सर्वांचे लक्ष वेधत आहे. साधारण: निसर्गाच्या चमत्कारीक घटनांत जुळी, तिळी मुळे होणे, एकाच बाळाला दोन डोके असणे, गुरांना पाठीवर अवयव असणे, तसेच जुळी फळे, फुले आदि प्रकार पाहायला मिळतात; परंतु फळातून पान उगवण्याचा प्रकार बहुधा पहिलाच असावा, असे वाटत आहे.