नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!

By Admin | Updated: May 15, 2017 01:16 IST2017-05-15T01:16:08+5:302017-05-15T01:16:08+5:30

वाशिम : डिसेंबर २०१४ मध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भातील नुकसान अहवाल देखील शासनाकडे पाठविण्यात आला.

Natural calamitous farmers waiting for help! | नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : डिसेंबर २०१४ मध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भातील नुकसान अहवाल देखील शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, अद्याप संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.
जिल्हयात ३१ डिसेंबर २०१४ रोजी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, हरभरा, तूर यासह इतर पिकांचे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे १० हजार ४९० शेतकरी बाधीत झाले होते. त्यात मालेगाव तालुक्यातील ८ हजार ३२४ शेतकऱ्यांच्या ३२२.५९ हेक्टरवरील गहू, २१६१.७२ हेक्टरवरील तूर, १३७.६७ हेक्टरवरील फळपिकांसह ६१.१८ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले.
यासह मंगरूळपीर तालुक्यातील १८ शेतकऱ्यांच्या २०.६० हेक्टर क्षेत्रावरील फळपिके, कारंजा तालुक्यातील २ हजार १४८ शेतकऱ्यांच्या २२०.८० हेक्टरवरील गहू, ७४५.३६ हेक्टरवरील तूर, ३६ हेक्टरवरील फळपिके आणि ३८.६० हेक्टरवरील इतर पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. दरम्यान, कृषी आणि महसूल विभागाने विनाविलंब नुकसानीचे सर्वेक्षण करून ४ हजार २३८ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल शासनाकडे पाठविला. मात्र, २ वर्षांचा मोठा काळ उलटूनही नुकसानग्रस्त एकाही शेतकऱ्याला अद्याप कुठलीच आर्थिक मदत मिळालेली नाही.

Web Title: Natural calamitous farmers waiting for help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.