राष्ट्रीय छात्र सेना मुख्यालयाच्या जागेचा गुंता कायम
By Admin | Updated: July 20, 2014 22:42 IST2014-07-20T22:42:42+5:302014-07-20T22:42:42+5:30
मंजुर झालेला निधी परतीच्या वाटेवर

राष्ट्रीय छात्र सेना मुख्यालयाच्या जागेचा गुंता कायम
वाशिम : शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षणाचे धडे गिरविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेची जिल्ह्यात पुरती वाताहत सुरू आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या वाशिम शहरात एनसीसीच्या मुख्यालयाची इमारत उभी करण्यासाठी सन २0११ मध्ये शासनाने निधी मंजुर केला आहे. मात्र, मुख्यालयासाठी जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे सदर निधी पडुन आहे. नव्हेतर परतीच्या वाटेवर आहे. परिणामी येथे एनसीसीच्या अंमलबजावणीची गती मंदावली आहे. सद्या जिल्ह्यातील केवळ चार शाळांमध्ये सदर योजनेचे प्रशिक्षण देणे सुरू आहे.
जिल्ह्यात माध्यमिक, उच्चमाध्यमिक, कनिष्ठ महाविद्याले व वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या सुमारे ३00 च्या घरात आहे. मात्र, यापैकी वाशिम शहरातील जिल्हा परिषद विद्यालय , बाकलीवाल विद्यालय व महात्मा गांधी विद्यालयातील प्रत्येकी ५0 तर मंगरूळपीरच्या एका विद्यालयातील ५0 असे एकूण २00 विद्यार्थीच राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण घेत आहेत. येथे मुख्यालयाची इमारत बाधण्यासाठी चार वर्षापूर्वी शासनाने मंजुरात दिली महाराष्ट्र बटालियनचे कमांडींग ऑफीसर कर्नल आर.व्ही.सिंग व ब्रिगेडीयर अब्राहमसुरू यांनी जागेची पाहणी केली परंतु अद्याप गुंता सुटु शकला नाही.
** एनसीसी मुख्यालयासाठी शहरात जागा उपलब्ध
वाशिम येथे एनसीसीचे मुख्यालय सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे जागा उपलब्ध आहे वाशिम रिसोड मार्गावर जवाहर नवोदय विद्यालयाची जुनी इमारत व परिसर तसेच जिल्हा परिषदेची जुनी इमारत या दोन्ही जागा यासाठी उपयुक्त असून एनसीसी साठी त्या जागा पुरेशा आहेत जवाहर नवोदय विद्यालयाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारीकरिता काम पाहतात त्यामुळे जवाहर नवोदय विद्यालयाची जुनी इमारत एनसीसी मुख्यालयात देण्यास अडचनीचे ठरत कामा नये.
** जिल्हाधिकर्यांशी झालेली चर्चा ठरली निष्फळ
स्कुल एज्युकेशन अँन्ड स्पोर्ट डिपार्टमेंट ने सन २0११ मध्ये वाशिम व सिंधुदुर्गा या दोन जिल्हयामध्ये नॅशनल एनसीसी मुख्यालय मंजूर केलेले असून २८ जुलै २0१२ ला या संदर्भात महाराष्ट्र बटालियनचे कमांडींग ऑफीसर कर्नल आर.व्ही.सिंग व अमरावती एनसीसी ग्रुप हेड चेग्रुप कंपाउर ब्रिगेडीयर अब्राहम यांनी वाशिम येथे जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली आहे. मात्र अजूनही याबाबत प्रशासन सुस्त असल्याचे दिसून येत आहे.