नाफेडचा काटा बंद : तूर कृउबास आवारात पडून
By Admin | Updated: April 24, 2017 14:14 IST2017-04-24T14:14:23+5:302017-04-24T14:14:23+5:30
नाफेडच्या हमीदराने तूर खरेदी केंद्रावरील वजनकाटे सोमवारी बंद झाले.

नाफेडचा काटा बंद : तूर कृउबास आवारात पडून
खामगाव : जिल्हाभरात असलेले नाफेडच्या हमीदराने तूर खरेदी केंद्रावरील वजनकाटे सोमवारी बंद झाले. शासन आदेशानुसार २२ एप्रिलपर्यंत सदर केंद्र सुरु राहणार असल्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटच्या दिनांकापर्यंत या केंद्रावर तूर विक्रीस आणली होती. मात्र या केंद्रावर अजूनही हजारो क्विंटल तूर पडून असून नाफेडने मात्र मालाचे मोजमाप थांबविले आहे. यामुळे केंद्रावर तूर आणणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आपल्या तुरीचे मोजमाप होईल किंवा नाही ,याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर नाफेडकडून शासकीय आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे.