नवमतदारांसाठी नाव नोंदणी मोहिमेस प्रारंभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 18:13 IST2018-07-31T18:13:25+5:302018-07-31T18:13:41+5:30
वाशिम : १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया नवमतदारांसह ज्यांची नावे अद्याप मतदार याद्यांमध्ये समाविष्ट नाहीत, अशा लोकांसाठी जिल्ह्यात नाव नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे.

नवमतदारांसाठी नाव नोंदणी मोहिमेस प्रारंभ!
वाशिम : १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया नवमतदारांसह ज्यांची नावे अद्याप मतदार याद्यांमध्ये समाविष्ट नाहीत, अशा लोकांसाठी जिल्ह्यात नाव नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे. त्याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन येथील निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.
संबंधित नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह नमुना-६ चा अर्ज जिल्ह्यातील सहाही ठिकाणच्या तहसिल कार्यालयांमधील मदत कक्षाकडे जमा करुन मतदार यादीमध्ये नावाची नोंदणी करावी. मतदाराचा पत्ता बदलला असल्यास किंवा इतर तपशिलात दुरुस्ती करावयाची असल्यास विहित नमुन्यातील अर्ज तहसिल कार्यालयातील मदत कक्षाकडे सादर करावे. मतदार यादीत दुबार नाव झालेले, मृत्यू पावलेले अथवा काही कारणास्तव जिल्ह्यातून परजिल्ह्यात स्थलांतरीत झालेल्या मतदारांबाबत योग्य ती नोंद करण्याकरीता आवश्यक ते नमुना अर्ज तहसिल कार्यालयातील मदत कक्षाकडे जमा करावे, असे आवाहन
उपजिल्हाधिकारी (महसूल) शैलेश हिंगे यांनी केले आहे.