शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील संगीत महाविद्यालयांचा ‘ताल’ बिघडला!

By admin | Updated: October 17, 2014 00:38 IST

४८ महाविद्यालयांतील तबला आणि हार्मोनिअम वादकांची पदे रिक्त.

वाशिम- राज्यातील विद्यार्थ्यांंना संगिताचे धडे देणार्‍या तब्बल ४८ संगीत महाविद्यालयांमधील संगिताचा ह्यतालह्ण बिघडला आहे. तबला आणि हार्मोनिअम वादकांच्या रिक्त पदांनी ही बाब अधोरेखित केली असून, याचा फटका विद्यार्थ्यांंना सोसावा लागत आहे. संगीत विषय शालेय, महाविद्यालयीन, तसेच विद्यापीठस्तरावर शिकविला जातो. राज्यात संगीत विषय शिकविणारी ४८ महाविद्यालये आहेत; मात्र दिवसागणिक या महाविद्यालयां तील संगिताचा सूर बिघडत चालला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या उदासिनतेमुळे या महाविद्यालयातील अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. काही पदे तर संपुष्टात येत आहेत. तबला वादक व हार्मोनिअम वादकांची पदे याचे उदाहरण आहे. संगीत शिक्षणासाठी, विशेषत: शास्त्रीय संगीत शिकविण्यासाठी तबला वादक व हार्मोनिअम वादकाची अत्यंत आवश्यकता असते; मात्र राज्यातील ४८ महाविद्यालयांमध्ये तबला व हार्मोनिअम वादकांची प्रत्येकी एक, अशी ९६ पदे आजमितीला रिक्त आहेत. उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्र. रा. गायकवाड यांनी १८ मे २0१२ रोजी प्रधान सचिवांकडे रिक्त पदे भरण्यासाठी प्रस् तावही सादर केलेला होता; मात्र अद्याप या प्रस्तावावर कारवाई झालेली नाही. महाविद्यालयांमध्ये संगीत कलावंत, शिक्षक, आकाशवाणी, दूरदर्शन, गीत व नाट्य विभाग, सांस्कृतिक विभाग या ठिकाणी नोकरीच्या अनेक संधी आहेत; मात्र तेथील रिक्त जागांवर नवीन नियुक्त्या करण्यासाठी संस्था आणि शासनानेही लक्ष देण्याची गरज आहे.