श्रीं ची पालखी आज जिल्ह्यात!

By Admin | Updated: June 6, 2017 01:05 IST2017-06-06T01:05:06+5:302017-06-06T01:05:06+5:30

मालेगाव : शेगांव येथिल श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे उद्या ६ जुन रोजी जिल्ह्यात आगमन होत आहे.

Mr. Palkhi today in the district! | श्रीं ची पालखी आज जिल्ह्यात!

श्रीं ची पालखी आज जिल्ह्यात!

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शेगांव येथिल श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे उद्या ६ जुन रोजी जिल्ह्यात आगमन होत आहे.
मेडशी येथे प्रथम पालखीचे स्वागत करण्यात येईल. यावेळी प स सदस्य गजानन शिंदे माजी प स सदस्य रणजीत मेडशिकर, माजी जि प अध्यक्ष मुकुंदर मेडशिकर, संजयराव घूगे आदि उपस्थित राहणार आहेत. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना जि. प. प्राथमिक शाळेत भोजन देण्यात येणार आहे. त्यानंतर पालखी श्री क्षेत्र डव्हा करिता रवाना होईल. मार्गात ब्राम्हणवाडा येथे स्वागत होईल. त्यानंतर सुकांडा मार्गे श्री नाथनंगे महाराज संस्थान श्री क्षेत्र डव्हा येथे पोहोचणार आहे. ७ जुनला सूर्योदयावेळी आरती नंतर पालखी मालेगावकडे रवाना होईल. मार्गात डव्हा फाट्यावर ग्रामस्थांतर्फे चहा व फराळाचे वाटप करण्यात येईल.

Web Title: Mr. Palkhi today in the district!