मोटारसायकल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: August 29, 2015 01:05 IST2015-08-29T01:05:52+5:302015-08-29T01:05:52+5:30
चोरीचे रॅकेट उघडकीस आणून चार आरोपींना अटक.

मोटारसायकल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
रिसोड(जि. वाशिम) : पोलीस विभागाच्या विशेष पथकाने मोटारसायकल चोरीचे रॅकेट उघडकीस आणून चार आरोपींना अटक केल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी घडली. पोलिसांना शहरातील यात्रा मैदानात काही इसम चोरीची मोटारसायकल घेऊन विक्रीकरिता येणार असल्याची माहिती प्राप्त होताच ठाणेदार एम.ए. रउफ यांनी विशेष पथकाचा सापळा रचून मोटारसायकलसह आरोपी ताब्यात घेतले. पोलिसांच्या ताब्यातील तीन आरोपी हे परभणी जिल्हय़ातील असून, एक आरोपी बुलडाणा जिल्हय़ातील आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या चार मोटारसायकलीचे नंबर हिरो होंडा स्प्लेंडर एम.एच. ३७ डब्ल्यू १७८५, हिरो होंडा स्प्लेंडर प्लस एम.एच. २१ जी. एल. ३६२, हिरो होंडा प्लस एम.एच. २२ एबी ४६४४ व काही विना नंबरच्या गाड्या आहेत. पकडण्यात आलेल्या गाड्यांची अंदाजे किंमत अंदाजे २ लाख ७0 हजार रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख अल्ताफ शेख चाँद (२३) रा. गुलशनपुरा जिंतूर जि. परभणी, शोएब खान नसीर खान (२0 वर्ष) रा. पठाणपुरा जिंतूर जि. परभणी, शेख वसीम शेख बिबन (२८) रा. धाड रोड, लोणार जि. बुलडाणा, शेख मुस्तफा शेख नसीर (२0) रा. जवाहर स्कूल जिंतूर हे असून, यातील दोन आरोपींविरुद्ध पोलिसांनी कलम ४0१, ४११, ३४ भादंविचा गुन्हा दाखल केला