वाशिम जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक शौचालय लाभार्थीचे अनुदान वर्षभरापासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:33 PM2017-11-16T13:33:05+5:302017-11-16T13:36:37+5:30

वाशिमःराज्य शासनाच्या स्वच्छता मीशन (नागरी) अंतर्गत जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक लाभार्थीचे अनुदान वर्षभरापासून रखडले आहे.

More than five hundred toilets beneficiary subsidy stopped in the washim district | वाशिम जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक शौचालय लाभार्थीचे अनुदान वर्षभरापासून रखडले

वाशिम जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक शौचालय लाभार्थीचे अनुदान वर्षभरापासून रखडले

Next
ठळक मुद्देलाभार्थींची पंचाईत स्वच्छता मिशन अडचणीत


वाशिमःराज्य शासनाच्या स्वच्छता मीशन (नागरी) अंतर्गत जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक लाभार्थीचे अनुदान वर्षभरापासून रखडले आहे. त्यामुळे संबंधिताची मोठी पंचाईत झाली आहे. बांधकाम अर्धवट असल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागते आणि त्यात गुड माॅर्निंग पथकाच्या कारवाईची भिती आहे.
जिल्ह्यात दोन वर्षापासून स्वच्छता मीशन अंतर्गत शौचालयांचि कामे करण्यात येत आहेत.  जिल्ह्यातील जवळजवळ ३० हजार कुटुंबांना शासनाच्या योजनेतून शौचालये मंजूर झाली. त्यासाठी लाभार्थींना नियमानुसार बांधकामानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान मिळणे अपेक्षित आहे;  परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक लाभार्थींना दुसर्या टप्प्यातील अनुदानहि मिळाले नाही.  त्यामुळे संबधित लाभार्थींना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 
शौचकुपानंतर काम रखडले असल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागत असून,  गुड माॅर्निंग पथकाने कारवाई केल्यास १२०० रूपये दंड भरावा लागण्याची भितीहि त्रस्त करून सोडत आहे. प्रशासनाने दखल घेऊन अनुदान देण्याचे प्रयत्न करावे, अशी मागणी लाभार्थि करीत आहेत.

Web Title: More than five hundred toilets beneficiary subsidy stopped in the washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.