शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल कसे यावरच अधिक भर !  -  एकनाथ डवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 19:45 IST

शेतकºयांचे उत्पादन कसे वाढेल, यावरच भर देण्याचा प्रयत्न आहे, असे मत राज्याचे कृषीसचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले.

- दादाराव गायकवाडवाशिम: विविध संकटांमुळे शेतीपिकांना फटका बसून शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. यातून मार्ग काढून शेतकºयांचे उत्पादन कसे वाढेल, यावरच भर देण्याचा प्रयत्न आहे, असे मत राज्याचे कृषीसचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले. ते  एका कार्यक्रमानिमित्त वाशिम येथे आले असता. शेतकºयांच्या  समस्यांबाबत  घेतलेली त्यांची ही मुलाखत

शेतकºयांना अधिकाधिक फायदा होण्यासाठी काय विशेष उपाय करणार ?शेतकºयांनी पिकविलेल्या शेतमालास अधिकाधिक दर मिळावेत म्हणून उत्पादन ते विक्री या दरम्यानची साखळी कमी करून शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीचे प्रयत्न आहेत. बाजारात ज्या शेतमालास मागणी आहे. तेच शेतकºयांनी पिकवावे, यावरही भर देण्यात येत आहे. त्यासाठीच विकेल ते पिकेल, हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  

विदर्भात कपाशीचे घटत असलेले क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करणार का?शेतकरी जे परवडेल, तेच पीक घेतो. सोयाबीन पीक शेतकºयांना फायद्याचे वाटत आहे. त्यामुळे इतर पिकांवर भर देण्यापेक्षा याच पिकाचे उत्पादन कसे वाढेल आणि शेतकºयांना कसा फायदा होईल, यावर भर देणे महत्त्वाचे आहे. 

बियाणे न उगवल्याच्या प्रकारात कंपन्यावरील कारवाईचे प्रमाण कमी असल्याचे दिसते, असे  का ?यंदाच्या हंगामात शेतकºयांनी पेरलेले बियाणे न उगवल्याची विविध कारणे आहेत. त्यात अतिवृष्टी आणि पेरणीतील तांत्रिक दोषाचा समावेश असला तरी काही कंपन्यांचे बियाणेही निकृष्ट आढळले. त्यामुळेच ८० पेक्षा अधिक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाहणीतील निष्कर्षानुसारच कारवाई होत आहे.   

वाशिम जिल्ह्यात कोणत्या फळलागवडीवर भर देण्याचा प्रयत्न आहे.?पूर्वी सिंचन विहिरी असलेल्यांनाच फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळत होता. आता शेततळेधारकांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात वाशिम जिल्ह्यात संत्रा लागवडीसाठी खूप वाव आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना या संदर्भात सुचना देऊन संत्रा पिकाचे क्षेत्र वाढविण्यास सांगण्यात येणार आहे. 

रब्बी हंगामाचे नियोजन काय ?राज्यात यंदा ६० लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरणीचे नियोजन आहे. त्यासाठी शेतकºयांना लागणारे बियाणे, खते आदिंची उपलब्धता करण्यात येत असून, शेतकºयांचे उत्पादन कसे वाढेल, यावरच कृषी विभागाचा अधिकाधिक भर राहणार आहे. कोणत्याही जिल्ह्यात खताचा तुटवडा भासू नये, म्हणून नियोजन करण्याच्या सुचना सर्व जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत. 

पंचनाम्यांतील विलंबामुळे नुकसान कसे कळणार ?- प्रशासकीय यंत्रणा अतिवृष्टी आणि पीक नुकसानाचे पंचनामे योग्य पद्धतीनेच करीत आहे. नुकसान झाले असेल, तर ते स्पष्ट होईल. शिवाय राज्यात राबविण्यात येत असलेल्या पीक कापणी प्रयोगातूनही शेतकºयांनी पेरलेल्या पिकांची स्थिती आणि त्यावर झालेला परिणाम दिसून येणार आहे. कोणाचे किती नुकसान झाले, तेसुद्धा त्या माध्यमातूून दिसून येणार आहे.   गतवर्षीच्या हंगामात घरगुती बियाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. त्याचे चांगले परिणामही दिसून आले. वाशिम जिल्ह्यात घरगुती बियाण्यांचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे, ही बाब चांगली आहे. इतरही जिल्ह्यात हा उपक्रम चागल्या प्रकारे राबविण्याच्या सुचना देण्यात येतील. शेवटी शेतकºयांचे उत्पादन वाढविण्यासाठी खर्चात बचत करणे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तथापि, यासाठी शेतकºयांनी बीज प्र्रक्रिया करावी आणि १० वर्षांच्या आतील बियाणे वापरावे.  

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र