मोफत गणवेशासाठी आणखी ९४ लाखांची गरज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 04:30 PM2019-07-01T16:30:07+5:302019-07-01T16:30:11+5:30

दोन गणवेशाकरीता ६०२३० विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ६१ लाख ३८ हजार रुपये प्राप्त होणे अपेक्षीत असताना केवळ २ कोटी ६७ लाख ६९ लाख ६१६ रुपये प्राप्त झाले आहेत.

More than 94 lakhs needed for free uniform | मोफत गणवेशासाठी आणखी ९४ लाखांची गरज 

मोफत गणवेशासाठी आणखी ९४ लाखांची गरज 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रति गणवेश ३०० रुपये प्रमाणे दोन गणवेशाकरीता ६०२३० विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ६१ लाख ३८ हजार रुपये प्राप्त होणे अपेक्षीत असताना केवळ २ कोटी ६७ लाख ६९ लाख ६१६ रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातून प्रति विद्यार्थी ४०० रुपये प्रमाणे २ कोटी ६५ लाख १२ हजारांची रक्कम जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील शाळांच्या खात्यांवर जमा करण्यात आली आहे. 
शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाºया अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत प्रति गणवेश २०० रुपये प्रमाणे शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन गणवेशांची रक्कम मंजूर करण्यात येत होती. या रकमेतून दोन गणवेशांची खरेदी करणे शाळांसाठी शक्य नव्हते. त्यामुळे शासनाने गणवेशाच्या निधीत वाट करून ३०० रुपये गणवेश प्रमाणे प्रति विद्यार्थी ६०० रुपये रक्कम खर्च करण्यास मंजुरी दिली. या मंजुरी प्रमाणे वाशिम जिल्ह्यातील  ६०२३० विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ६१ लाख ३८ हजार रुपये प्राप्त होणे अपेक्षीत असताना केवळ २ कोटी ६७ लाख ६९ लाख ६१६ रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातून प्रति विद्यार्थी ४०० रुपये प्रमाणे २ कोटी ६५ लाख १२ हजारांची रक्कम जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील शाळांच्या खात्यांवर जमा करण्यात आली आहे.
 

एका गणवेशासाठी ३०० रुपये प्रमाणे दोन गणवेशांसाठी ६०० रुपयांची रक्कम खर्च करण्यास शासनाने मंजुरी दिली असली तरी, जिल्ह्यासाठी केवळ २ कोटी ६७ लाख ६९ लाख ६१६ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून प्रति विद्यार्थी ४४० रुपये प्रमाणे निधी शाळांच्या खात्यावर जमा करण्यात आला, तर उर्वरित १६० रुपयांसाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.
-गजाननराव डाबेराव
उपशिक्षणाधिकारी (प्राथ)
जि.प. वाशिम

Web Title: More than 94 lakhs needed for free uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.