स्थगिती उठविली; जि.प., पं.स. पोटनिवडणुकीसाठी ५ ऑक्टोबरला मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST2021-09-14T04:48:45+5:302021-09-14T04:48:45+5:30

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांच्या पोटनिवडणूक कार्यक्रमावरील स्थगिती सोमवार, १३ सप्टेंबर रोजी ...

Moratorium lifted; Z.P., P.S. Voting for by-elections on October 5! | स्थगिती उठविली; जि.प., पं.स. पोटनिवडणुकीसाठी ५ ऑक्टोबरला मतदान!

स्थगिती उठविली; जि.प., पं.स. पोटनिवडणुकीसाठी ५ ऑक्टोबरला मतदान!

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांच्या पोटनिवडणूक कार्यक्रमावरील स्थगिती सोमवार, १३ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने उठविली असून, आता ५ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान आणि ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला होता. परंतु, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या ९ जुलैच्या आदेशानुसार पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमास स्थगिती देण्यात आली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका निकाली काढताना, कोरोनासंदर्भातील शासनाची अधिसूचना ही निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्यापासून रोखू शकत नाही व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार हा आयोगाचाच आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवार, ११ सप्टेंबरला दिला. न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रमावरील स्थगिती उठविली असून, स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने ५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे १३ सप्टेंबर रोजी जाहीर केले. पोटनिवडणुकीवरील स्थगिती उठविण्यात आल्याने, जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी पुन्हा वेग घेतल्याचे दिसून येते.

०००००००

असा आहे पोटनिवडणूक कार्यक्रम

२१ सप्टेंबर - वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे

२७ सप्टेंबर - उमेदवारी अर्ज मागे घेणे,

५ ऑक्टोबर - मतदान

६ ऑक्टोबर - मतमोजणी

०००००००

उमेदवार लागले कामाला!

पोटनिवडणुकीवरील स्थगिती उठविण्यात आल्याने उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार पुन्हा एकदा प्रचारकार्यात सक्रिय झाले आहेत. सर्कलमधील त्या-त्या गावातील प्रमुख समर्थक, हितचिंतकाकडून आढावा घेत मतांची गोळाबेरीज जुळविण्यात उमेदवार व्यस्त होत झाल्याचे दिसून येते.

.............

पोटनिवडणूक होणारे एकूण गट १४

पोटनिवडणूक होणारे एकूण गण २७

....................

असे आहेत जिल्हा परिषदेचे गट

काटा, पार्डी टकमोर, उकळी पेन, पांगरी नवघरे, कवठा खुर्द, गोभणी, भर जहागीर, दाभा, कंझरा, आसेगाव, भामदेवी, कुपटा, तळप बु., फुलउमरी.

०००००००००००००००००००००००००००

पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी कॉंग्रेस १२

कॉंग्रेस ९

वंचित बहुजन आघाडी ८

जनविकास ७

भाजपा ७

शिवसेना ६

अपक्ष ३

Web Title: Moratorium lifted; Z.P., P.S. Voting for by-elections on October 5!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.