मान्सूनपूर्वी गावातील नाल्या सफाईची कामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST2021-06-04T04:31:38+5:302021-06-04T04:31:38+5:30
काजळेश्वर उपाध्ये : पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाणी वाहून जाण्यासाठी गावातील मुख्य नाल्याची सफाई प्रशासनाने करावी अशी मागणी येथील प्रहार ...

मान्सूनपूर्वी गावातील नाल्या सफाईची कामे करा
काजळेश्वर उपाध्ये : पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाणी वाहून जाण्यासाठी गावातील मुख्य नाल्याची सफाई प्रशासनाने करावी अशी मागणी येथील प्रहार जनशक्ती संघटनेने केली आहे. पावसाळा सुरू होत असून गावातील मान्सूनपूर्व कामे बाकी आहेत. गावातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या केरकचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. रस्तावरही काही ठिकाणी पाण्याची डबकी साचली आहेत. गावच्या रस्त्यालगतच्या नाल्यात कचरा साचल्याने पाणी वाहून न जाता ते रस्त्यावर येत आहे. यामुळे काही नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. नाल्याची साफसफाई, मान्सूनपूर्व कामे ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू करावीत. तसेच रस्ता ओलांडताना काही ठिकाणी सिमेंटचे पाईप बसविणे गरजेचे आहे. तरी ग्रामपंचायतीने लक्ष देऊन कामे सुरू करण्याची मागणी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रहार सेवक प्रदीप उपाध्ये यांनी गावचे मुख्य प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
कोट:
गावातील नाल्यासफाईसह मान्सूनपूर्व कामे करण्यासंबंधीची चर्चा गावचे प्रशासक पुंडलिकराव देशमुख यांच्यासोबत केली असून निधीची उपलब्धता करून गावच्या नाल्या सफाईची कामे तातडीने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
सतीश वर्घट
ग्रामविकास अधिकारी, काजळेश्वर.