विनयभंगप्रकरणी आरोपीस १ वर्ष सक्तमजूरी!

By Admin | Updated: April 11, 2017 21:12 IST2017-04-11T21:12:42+5:302017-04-11T21:12:42+5:30

मानोरा- वाईगौळ येथे ३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या विनयभंग प्रकरणातील आरोपीस, न्यायालयाने मंगळवारी १ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा व चार हजार रूपये दंड ठोठावला.

Molestation accused accused for 1 year! | विनयभंगप्रकरणी आरोपीस १ वर्ष सक्तमजूरी!

विनयभंगप्रकरणी आरोपीस १ वर्ष सक्तमजूरी!

दोन वर्षानंतर मिळाला पिडितेला न्याय

मानोरा (जि.वाशिम) : येथील पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या वाईगौळ येथील आरोपीने विनयभंग केल्याची तक्रार ३ फेबु्रवारी २०१५ रोजी पोलिसांत दाखल झाली होती. त्या प्रकरणाचा निकाल मंगळवारी लागला असून संबंधित आरोपीस १ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा व चार हजार रुपये दंड न्यायालयाने ठोठावला आहे.
याबाबत सविस्तर असे की, आरोपी संजय हरी राठोड (रा.वाईगौळ, ता. मानोरा) हा घटनेच्या दिवशी फिर्यादीच्या घरी आला व आवाज देऊन त्याने संडासला जाण्याकरिता डब्बा मागितला. फिर्यादीने स्नानगृहातून पाण्याचा डब्बा भरुन देत असताना त्याने तीचा विनयभंग केला. याप्रकरणी ३ फेबु्रवारी २०१५ रोजी पोलिसांत दाखल फिर्यादीवरून आरोपीविरुध्द भादंविचे कलम ३५४ व ३५४ अ (१) (२) फौजदारी दुरुस्ती कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करुन दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. साक्ष, पुरावे तपासल्यानंतर प्रथम श्रेणी न्यायाधिश व्ही.व्ही.निवघेकर यांनी ११ एप्रिल रोजी आरोपी हरी राठोड यास १ वर्ष कारावास व ४ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एम.जी.शर्मा यांनी काम पाहिले व पैरवी म्हणून एन.पी.सी.शरद राठोड यांनी सहकार्य केले. गुन्हयाचा तपास जमादार विजय जाधव यांनी केला.

Web Title: Molestation accused accused for 1 year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.