मनसेने चिखली बु. रस्त्याचे घातले श्राद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:17+5:302021-07-10T04:28:17+5:30

जिल्हा परिषद, बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने विशेषत: रात्रीच्या सुमारास हा रस्ता दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. याबाबत मनसेने ...

MNS Chikhali Bu. Shraddha laid on the road! | मनसेने चिखली बु. रस्त्याचे घातले श्राद्ध!

मनसेने चिखली बु. रस्त्याचे घातले श्राद्ध!

जिल्हा परिषद, बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने विशेषत: रात्रीच्या सुमारास हा रस्ता दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. याबाबत मनसेने ऑक्टोबर महिन्यात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर काही दिवसांत पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अखेर रस्त्यावरील खड्ड्यांचे श्राद्ध घालून मनसेने आगळेवेगळे आंदोलन केले.

आंदोलनात मनसेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डागे, चिखली शाखाध्यक्ष डिगांबर वैरागडे, गजानन वैरागडे, मोहने कोल्हे, सुनील वानखेडे, रघुनाथ खुपसे, गजानन जैताडे, संतोष खंदारे, शिवराज टोलमारे, प्रतीक कांबळे, विठ्ठल राठोड, उमेश टोलमारे, गजानन बर्डे, गजानन ठाकरे, आशिष टोलमारे, सुनील जैताडे, किशोर गजरे, संजय गव्हाण, धीरज मैंदकर, मोहम्मद चौधरी, शंभू जाधव, विष्णू शिखारे, शंकर इढोळे, विष्णू धनगर, गजानन गिरी, प्रतीक कांबळे, श्याम डोंगरे, बबन हनवते, सुधाकर घुले, पांडुरंग वैरागडे, शंकर घुगे, मिलिंद राऊत, बाबाराव सोनोने, अनिल घुले, रामकृष्ण घुले, कैलास राऊत, मर डोंगरे, पवन राऊत सहभागी झाले.

यावेळी एपीआय विनोद झळके, पीएसआय रमेश पाटील यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: MNS Chikhali Bu. Shraddha laid on the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.